आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे आणि त्यामुळे यांचा आरोग्यावर परिणाम होतो आणि आपण अनेक आजारांनी वेढले जातो. त्यामुळे या समस्यापासून दूर राहण्यासाठी आपण आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे फळं आणि भाज्या खात असतो. अशातच आजकाल अॅव्होकॅडोपासून बनवलेल्या गोष्टी खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. पण सर्वांनाच अॅव्होकॅडो आवडत नाही आणि ते महाग देखील असते. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अॅव्होकॅडो व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता.
अॅव्होकॅडो हे असे एक फळ आहे ज्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, ई, बी6 आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. तुम्ही अॅव्होकॅडो हे फळ टोस्टवर ठेवून किंवा त्यांचे सँडविच बनवून खाऊ शकता. जरी अॅव्होकॅडो हे पोषक तत्वांचे भांडार असले तरी, काही पदार्थांमध्ये त्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात.
जर तुम्हाला अॅव्होकॅडो आवडत नसेल, तर आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत जे अॅव्होकॅडोपेक्षा तुमच्या आरोग्यासाठी अधिक पौष्टिक आणि फायदेशीर असू शकतात. कोलेजन आणि व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यास मदत करणारे कोणते सुपरफूड्स आहेत ते जाणून घेऊया.
लिंबूवर्गीय फळे कोलेजन वाढवतील
100 ग्रॅम अॅव्होकॅडोमध्ये फक्त 10 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, तर लिंबू, संत्री,मोसंबी, द्राक्षे आणि किवी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये 53 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते. लिंबू देखील स्वस्त आहे आणि त्याचे पौष्टिक मूल्य अॅव्होकॅडोपेक्षा जास्त आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात लिंबाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत आणि कोलेजन वाढवण्यास देखील मदत करतात. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि गुळगुळीत दिसते.
हिरव्या पालेभाज्या
100 ग्रॅम अॅव्होकॅडोमध्ये 160 कॅलरीज असतात. तर हिरव्या पालेभाज्या पालकामध्ये 23 कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या कमी होते. पालक हा अॅव्होकॅडोपेक्षा स्वस्त आहे आणि त्यात कॅलरीजही कमी आहेत, म्हणून अॅव्होकॅडोऐवजी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश केला पाहिजे.
दुग्धजन्य पदार्थ
100 ग्रॅम अॅव्होकॅडोमध्ये सोडियमचे प्रमाण फक्त 7 ग्रॅम असते, तर दुसरीकडे दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये 44 ग्रॅम सोडियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखते.
टोमॅटो कोलेजन वाढवण्यासाठी प्रभावी
100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 18 कॅलरीज असतात तर अॅव्होकाडोमध्ये 160कॅलरीज असतात. जे कोलेजन वाढवण्यास मदत करते, तुमची त्वचा चमकदार ठेवते आणि तुमचे केस देखील जाड आणि लांब होतात.
चिया बियाणे
100 ग्रॅम अळशीच्या बियांमध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात, तर 100 ग्रॅम अॅव्होकाडोमध्ये फक्त 2 ग्रॅम प्रथिने असतात. अॅव्होकाडो इतका महाग आहे की, तुम्ही त्याऐवजी तुमच्या आहारात अळशीच्या बियांचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. जे तुम्हाला अॅव्होकॅडोपेक्षा जास्त प्रथिने देईल. या गोष्टी खाल्ल्याने केवळ आरोग्यालाच फायदा होत नाही तर त्वचा आणि केसांनाही फायदा होतो
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)