Singer Pawandeep Car Accident : इंडियन आयडॉल सीझन 12 चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप राजन याचा अहमदाबादजवळ अमरोहा येथे भीषण अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे 3:40 वाजता अमरोहा परिसरात त्याच्या कारचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्याच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पवनदीप गंभीर अवस्थेत दिसत आहे.
अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरशः चुराडे झाले आहेत. गाडीच्या अवस्थेवरून अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. सध्या वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र त्याच्या चाहत्यांनी त्याचे चाहते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
पवनदीप राजन हा उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी मध्ये उत्कृष्ट गायन कौशल्य दाखवून विजेतेपद पटकावले होते. त्याला पुरस्कार म्हणून 25 लाख रुपये आणि एक लक्झरी कार मिळाली होती. संगीताच्या क्षेत्रात त्याचे योगदान मोठे असून तो विविध वाद्ये वाजवण्यातही पारंगत आहेत.
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट्ससाठी नेटकरी वाट पाहत आहेत. पवनदीप याचे कुटुंबीय आणि मॅनेजर कडून अद्याप अधिकृत निवेदन आले नाही, यामुळे त्याच्या प्रकृतीबद्दल कोणता अंदाज लावला जात नाही.