गाडी चालवताना रस्त्यावर पिवळा की पांढरा लाईट योग्य? तुम्ही अशी चूक तर करत नाही ना
GH News May 06, 2025 01:06 AM

देशात कार अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सर्वाधिक अपघात होण्याचं प्रमाण हे रात्रीच्या वेळेचं आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. गाडी चालवताना हेडलाइट्सचा वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण योग्य लाईट्सचा वापर केल्या सुरक्षा दृष्टीने योग्य ठरतं. अनेकदान लोकांना कळतंच नाही की पिवळी लाईट वापरावी की पांढरी.. या दोन्ही लाईट्सचे फायदे आणि तोटे आहेत. या दोन्ही लाईट्सचा परिस्थितीनुसार उपयोग करणं आवश्यक आहे.

पिवळा लाईट

पारंपारिक हॅलोजन बल्ब किंवा फॉग लाईट्समध्ये पिवळा प्रकाश पडतो. हा लाईट धुकं, पाऊस किंवा खराब हवामानात प्रभावी ठरतो. हा लाईट अशा परिस्थिती लांबपर्यंत पडतो. समोरून येणाऱ्या वाहनालाही याचा अंदाज येतो. हा प्रकाश धुक्यात पसरण्याऐवजी रस्त्यावर राहतो. यामुळे दृश्यमानता वाढते आणि चालकाला रस्त्यावरून गाडी चालवणं सोपं जातं. या व्यतिरिक्त पिवळ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण कमी येतो आणि लांब पल्ल्याचा प्रवास करताना ड्रायव्हरचा थकवा कमी होतो.

पांढरा लाईट

पांढरा प्रकाश आधुनिक एलईडी किंवा एचआयडी बब्लमधून यतो. हा प्रकाश चमकदार आणि स्टायलिश दिसते. स्वच्छ हवामान आणि शहरी भागात लांब अंतरावरचं यामुळे स्पष्ट दिसतं. यामुळे गाडी चालवणं सोपं जातं. पण जास्त चमकदार असल्याने वाहनचालक संभ्रमित होऊ शकतात. तसेच अपघाताचा धोका वाढतो. इतकंच काय पाऊस किंवा धुक्यात प्रकाश पसरतो आणि दृश्यमाना कमी होते.

कोणता लाईट कधी निवडावा?

तुम्ही शहरी भागात गाडी चालवत असाल आणि हवामान सामान्य असेल तर पांढरा लाईट योग्य ठरले. पण खराब हवामान असेल, धुक्यात किंवा महामार्गावर लांब पल्ल्याचं अंतर असेल तर पिवळा लाईट योग्य ठरेल. पण परिस्थितीचे आकलन न करता कोणत्याही वेळी कोणताही दिवा वापरल्यास चुका होतात. त्यामुळे स्वत:ची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक लाईट्सचा वापर योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.