राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा राज्यातील 6 लाख 71 हजार ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.
वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून ३०००रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात? पात्रता काय? कुठे अर्ज करायचा? सर्व A to Z माहिती वाचा..
अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा. त्याचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
राज्यातील किमान ३० टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
आधार कार्ड
ओळखपत्र
आय प्रमाण पत्र
जात प्रमाणपत्र
स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र
समस्येचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात. यात खालील उपकरणांचा समावेश आहे.
चष्मा, ट्रायपॉड, कमरेसंबंधीचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इ.
सध्या या योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागतो. अर्जदारांनी समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा