मंगळवारी 5 मे रोजी आयपीएल 2025 मधील 55 व्या सामन्यात होम टीम मुंबई इंडियन्स पाहुण्यात गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबईचा हा या मोसमातील 11 वा तर गुजरातचा 11 वा सामना असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ या मोसमात 29 मार्चनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. गुजरातने मुंबईवर 29 मार्चला 36 धावांनी पराभूत केलं होतं. तसेच मुंबईसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबानेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईचा घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये गुजरातचा धुव्वा उडवत मागील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबईने या मोसमात 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मुंबईला पहिल्या 5 सामन्यांमधील 4 सामने गमवावे लागले. जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती आणि रोहित शर्मा याच्या निराशाजनक कामगिरीमुळे मुंबईला पहिल्या काही सामन्यांमध्ये यश मिळालं नाही. मात्र त्यानंतर बुमराहचं कमबॅक झालं आणि रोहितला सूर गवसला. मुंबईने इथून विजयाचा गिअर बदलला. मुंबईने सलग 6 सामने जिंकले.
मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत त्यांचा विजय रथ रोखला. त्यानंतर मुंबईने सनरायजर्स हैदाराबाद, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सवर मात केली आणि सलग 6 सामने जिंकले. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीने मुंबईच्या तुलनेत 1 सामना कमी खेळला आहे. दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबई आणि गुजरात दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 14 गुण आहेत. तसेच दोन्ही संघ प्लेऑफचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र मुंबईने सलग 6 सामने जिंकल्याने गुजरातसमोर मुंबईची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.
हार्दिकचा गुजरात विरुद्धच्या सामन्याआधी जोरदार सराव
ताज्या आकडेवारीनुसार मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानी आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +1.274 असा आहे. तर गुजरातचा नेट रनरेट हा +0.867 असा आहे. त्यामुळे गुजरात वानखेडेत पलटणवर मात मोसमातील दुसरा विजय मिळवणार? की मुंबई हिशोब चुकता करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.