लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. निरनिराळ्या भूमिका साकारत स्वप्नील घराघरात पोहोचला. अगदी लहानपणापासून पडद्यावर दिसणारा स्वप्नील प्रेक्षकांचा कृष्ण बनला. त्याला मराठीमधील चॉकलेट बॉयदेखील म्हटलं जातं. स्वप्नील चे सध्या काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवायला अयशस्वी ठरले असले तरी तो मराठीमधील सर्वाधिक फी घेणारा अभिनेता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वप्नीलने त्याच्या कमाईवर भाष्य केलंय.
स्वप्नील मराठीमधील टॉप अभिनेता आहे. त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. सोशल मीडिया असो किंवा खरं आयुष्य स्वप्नीलचे चाहते कायम त्याच्या अभिनयाची दाद देत असतात. तसेच चित्रपट चांगला न झाल्यास त्याला हक्काने ओरडतात देखील. स्वप्नील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांचा ब्रँड एम्बॅसिडर आहे. तो वर्षाला ३ ते ४ चित्रपट करत असतो तर सोबतच इतर अनेक जाहिरातीदेखील करताना दिसतो. त्याच्याकडे प्रायव्हेट जेट आहे. नुकतीच त्याने महागडी गाडी खरेदी केली. त्यामुळेच एका पॉडकास्टमध्ये त्याला तू महिन्याला किती कमावतो असा प्रश्न विचारण्यात आला.
स्वप्नीलने नुकतीच 'दॅट ऑड इंजिनिअर' या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. यात बोलताना त्याला विचारलं चित्रपट, पी एन जी ज्वेलर्सचं उदघाटन, इव्हेंट, प्रायव्हेट जेट, रोल्स रॉयल्स, तू नेमकं किती कमावतो? त्यावर उत्तर देताना स्वप्नील म्हणाला, 'सुखी आयुष्य जगण्यासाठी लागतात तेवढे. तुझ्या हातात प्रश्न विचारणं आहे. उत्तर तर मीच देणार ना.गूगलवरचं उत्तर खरं म्हणायचं असेल तर गूगलबरोबर पॉडकास्ट कर. पॉडकास्ट माझ्याबरोबर असेल तर माझं उत्तर ऐकायला लागणार.' त्याच्या या उत्तराचं नेटकरीही कौतुक करत आहेत.
गूगलवर किती आहे कमाईचा आकडा?गूगलवर स्वप्निलच्या कमाईचा आकडा बराच मोठा आहे. तो एका चित्रपटासाठी ५० लाख ते १ कोटी रुपये आकारत असल्याचं लिहिलं आहे. तर तो मालिकेच्या एका भागासाठी ६० ते ७० हजार रुपये मानधन घेत असल्याचं नमूद आहे.