BLOG : फॅमिलीमध्ये एकटा मसूद अजहर वाचला असेल, तर तो पण लवकर मरणार, लिहून ठेवा, कारण…
GH News May 07, 2025 04:09 PM

भारताने मध्यरात्री POK आणि पाकिस्तानात एकूण नऊ ठिकाणी एअर स्ट्राइक केला. यात भारताचा कट्टर शत्रू जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या घरावर सुद्धा एअर फोर्सने हल्ला केला. या हल्ल्यात मौलाना मसूद अजहरच्या घरातील 14 दहशतवादी मारले गेले आहेत. मसूद अजहरने 10 जणांचा मृत्यू झाल्याच कबूल केलं आहे. भारतीय सीमेपासून 100 किलोमीटर दूर बहावलपूरमध्ये मसूद अजहरच घर आहे. रात्री 1.05 ते 1.30 दरम्यान ही सगळी कारवाई झाली. मसूदच सगळं कुटुंब झोपलेलं, त्या ठिकाणी अचूक प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात 10 लोक मारले गेल्याच अजहरने कबूल केलं आहे. मसूदनुसार, पाच मुलं आणि काही महिलांचा मृत्यू झाला आहे. मसूदच्या बहिणीचा नवरा सुद्धा यामध्ये मारला गेलाय.

मसूद अजहर भारताच्या हिटलिस्टवर आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अंडरग्राऊंड होता. पहलगाम हल्ल्यामागे हाफीज सईदच्या लष्कर-ए-तैयबाचा हात आहे. पण 2019 साली पुलावामा याच अजहरने घडवून आणलं होतं. त्यावेळी भारताने बहावलपूरऐवजी खैबर पख्तूनख्वामधील जैश ए मोहम्मदच्या तळाला टार्गेट केलं होतं. बरेच दहशतवादी मारले होते. पण यावेळी पीएम मोदींनी कल्पनेच्यापलीकडे शिक्षा दिली जाईल असं म्हटलं होतं, त्यानुसार एकाचवेळी लष्कर, जैशसह नऊ ठिकाणांना टार्गेट केलं.

त्यांचा हिशोब अजून बाकी आहे

संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मीसुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. खरच मौलाना मसूद अजहर सुद्धा लवकरच मरणार आहे. हे त्याने लिहून ठेवावं. कारण हा एअर स्ट्राइक ही भारताच्या Action ची पहिली प्रतिक्रिया आहे. पहलगाम हल्ल्यामागे बरेच सूत्रधार ते सगळेच संपलेले नाही. त्यांचा हिशोब अजून बाकी आहे.

घुसके मारेंगे

मागच्या एक-दोन वर्षातील एक घटना तुम्ही लक्षात घ्या. पाकिस्तानात जे कोणी भारताचे शत्रू आहेत, त्यांना वेचून, वेचून ठार मारलं जात आहे. या सगळ्या ऑपरेशन्समागे कुठली अज्ञात शक्ती आहे, माहित नाही. पण असं म्हटलं जात होतं, पुढचा नंबर हाफीज सईद आणि मसूद अजहरच असणार. आता मौलाना मसूद अजहर घरी नव्हता, म्हणून तो वाचला असेल. पण पूर्वीसारखं त्याला आता पाकिस्तानात बिनधास्त राहता येणार नाही, फिरता येणार नाही. एक ना एक दिवस त्याचाही शेवट, अंत नक्की आहे. घुसके मारेंगे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.