पुणे : पुणे ग्रामीण मधील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेले बांगलादेशी ताजमीर मोश्ताफा अन्सारी वय - 29 वर्ष, यास ओतूर पोलीस स्टेशन चे अधिकारी व स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडे विचारपूस करून त्याचा बांगलादेशी मित्र नामे मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी वय 28 वर्ष दोघेही रा. ओतूर बांगलादेश मूळ रा. बोकराई जिल्हा शारखीरा बांगलादेश यांना ओतूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
त्यांच्या कडून भारतीय बनावट आधार कार्ड. पॅनकार्ड. ड्रायव्हिंग लायसन्स. मोबाईल हँडसेट, आणि दोघांचे बांगलादेशी पासपोर्ट विसा संपलेले जप्त केले आहेत. सदर कारवाई आमचे मार्गदर्शना नुसार API दत्तात्रय दराडे. HC शरद जाधव आणि PC तांदळवाडे यांनी ओतूर पो स्टे मार्फत केली.