जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला केला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. देशाच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईत 9 ठिकाणी हल्ला केला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते. या ऑपरेशन सिंदूरचे मिनिट टू मिनिट डिटेल्स जाणून घेऊया.
असे झाले ऑपरेशन सिंदूर
रात्री 1.47 वाजता: PoK स्फोटाचा आवाज ऐकू आला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुझफ्फराबाद शहराभोवती असलेल्या पर्वतांजवळ अनेक मोठे स्फोट ऐकू आल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटांनंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.
1.51 वाजता: भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ले केले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.
यानंतर काही वेळातच संतापलेल्या पाकिस्तानी लष्कराकडून एक निवेदन आले. भारताच्या कृतीला प्रत्युत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.
2.10 वाजता: भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ला केल्याची अधिकृत माहिती समोर आली. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. एकूण 9 ठिकाणी हल्ले झाले.
2.17 वाजता: पाकिस्तानच्या डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
4.13 वाजता: या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचा वापर करण्यात आला. यामध्ये प्रिसिजन अटॅक वेपन सिस्टीमचा वापर करण्यात आला.
4.32 वाजता: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताच्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांच्याशी चर्चा केली.
4.35 वाजता:भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.
5.04 वाजता: हल्ला झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे.
5.27 वाजता: आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेला आशा आहे की हे लवकरच संपेल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो म्हणाले.
5.45 वाजता: कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली.
6.00 वाजता: पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आणि पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर गली भागात तोफांचा मारा केला.
6.08 वाजता: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले सर्व भारतीय वैमानिक आणि लढाऊ विमाने सुरक्षितपणे तळावर परतले.
6.14 वाजता: पाकिस्तानने आपली एअरस्पेस बंद केली.
9 ठिकाणी झाला हल्ला, दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य
बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे.
मुरीदके सांबाच्या समोरील सीमेपासून 30 किमी आत लष्कर-ए-तैयबा कॅम्प. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी येथूनच आले होते
गुलपूर हे पूंछ-राजौरीपासून नियंत्रण रेषेच्या आत 35 किमी अंतरावर आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ येथे झालेला हल्ला आणि जून 2024 मध्ये प्रवासी बसवरील हल्ला यांचे मूळ येथेच आहे.
पीओजेकेच्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किमी आत लष्कर कॅम्प सवाई.
बिलाल कॅम्प हे जैश-ए-मोहम्मदचे लाँचपॅड आहे.
राजौरीच्या समोर नियंत्रण रेषेच्या आत 15 किमी अंतरावर लष्कर कोटली कॅम्प. लष्कराचे बॉम्बस्फोट प्रशिक्षण केंद्र, 50 दहशतवाद्यांची क्षमता.
बरनाला कॅम्प राजौरी समोरील एलओसीच्या आत 10 किमी अंतरावर
सांबा-कठुआच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत 8 किमी अंतरावर, सरजल कॅम्प जैश कॅम्प
सियालकोटजवळील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत आहे मेहमूना कॅम्प, हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र आहे.