पाकिस्तानमधील सोन्याच्या किंमती: भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या (Pakistan) दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने मंगळवार आणि बुधवारी रात्री 9 दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. तर यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्यावची माहिती समोर आली आहे.
एकूणच या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांसह पकड्यांना भारतीय सैन्यदलाने त्याची जागा दाखवून निर्वाणीचा इशारा दिला आहे. 12 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15व्या दिवशी भारताने ही प्रत्युत्तराची कारवाई केली आहे. भारतीय सैन्याच्या या प्रत्युत्तराच्या कारवाईचा परिणाम पाकिस्तानी शेअर बाजारावर (Pakistan stock market) तसेच सोन्याच्या किमतींवर (Gold Prices) झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकीकडे, ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानी जनतेला हादरवून टाकले आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारावरही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या व्यवहारातच, बेंचमार्क स्टॉक निर्देशांकात 5.78 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. दरम्यान, केएसई (KSE) 100 निर्देशांक 6,272 अंकांनी किंवा 5.5 टक्क्यांनी घसरून 1, 07 296 वर व्यवहार करत होता. दुसरीकडे, पाकिस्तानमध्येही सोन्याच्या किमतीही वाढल्या आहेत. आज, बुधवारी(7 मे 2025), पाकिस्तानमध्ये एक ग्रॅम सोन्याची किंमत PKR 30,585.97 आहे, 10 ग्रॅमची किंमत PKR 305,886.80 आहे. आज येथे सोने प्रति तोळा 3, 56, 780. 40 रुपयांना विकले जात आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तान बाजारात सोन्याचा भावात मोठी वाढ झाली आहे. ऑल-पाकिस्तान जेम्स अँड ज्वेलर्स सराफा असोसिएशन (APGJSA) नुसार, मंगळवारी पाकिस्तानमध्ये प्रति तोळा सोन्याचा भाव 6,100 रुपयांनी वाढून 3, 56, 100 रुपये झाला. त्याचप्रमाणे, 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 5,232 रुपयांची वाढ झाली आहे आणि आता ते 3, 05, 300 रुपयांना विकले जात आहे. तर सोमवारी हाच सोन्याचा दर तोळा 7, 800 रुपयांनी वाढून 3,50,000 रुपये झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हे घडले आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..