खाणे आणि आरोग्य यांचे घनिष्ठ नाते आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे म्हणजे केवळ पोषणयुक्त आहाराने भागणार नाही. तर खाण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे पण आवश्यक आहे. योग गुरु बाबा रामदेव आणि आयुर्वेदातील तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या पुस्तकात याविषयीची खास माहिती आहे. द सायन्स ऑफ आयुर्वेदा या पुस्तकात या दोघांनी आरोग्यदायी राहणीमानाविषयी विस्तृत आणि बारीकसारीक माहिती दिली आहे. हे पुस्तक एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. या पुस्तकातील अनेक नुस्खे, सल्ले तुम्हाला स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी मोलाचे ठरतील. खाण्याची योग्य सवय अंगी लावून घेतल्यास अनेक आजार छुमंतर तर होतीलच पण तुमचे आरोग्य सुद्धा निरोगी राहील.
ताजे आणि गरमा गरम जेवण करा
आचार्य बालकृष्ण यांनी या पुस्तकात, नेहमी ताजे आणि गरम अन्न खान्याचा सल्ला दिला आहे. असे जेवण रुचकरच नाही तर पौष्टिक पण असते. त्याचे पचन पण लवकर होते. थंड आणि शीळे अन्न हे पोषक नसते. उलट त्याने शरीराला उपाय होऊ शकतो. पाकिटबंद, डब्बाबंद, सीलबंद अन्नपदार्थ, अन्नघटक खाणे आरोग्यास घातक असल्याचे हे पुस्तक सांगते.
अन्नपदार्थांची मांडणी असावी आकर्षक
आयुर्वेदानुसार, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म, जेवण केवळ गप्पागप खाऊन संपवण्याची गोष्ट नाही. जेवणा हा रसग्रह, साग्रसंगीतासह ग्रहण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जेवण्याची व्यवस्था स्वच्छ ठिकाणी असावी. ताटातील पदार्थांची योग्य मांडणी असावी. त्यामुळे भूक उत्तेजित होते. पाचक रस पाझरतात. स्वयंपाक मन लावून करणे आवश्यक आहे. स्वयंपाक घरात जेवणाचा सुवास असावा.
वातावरण असावे अनुकूल
जेवायला बसताना ती जागा स्वच्छ, प्रसन्न असावी. जेवताना आरडाओरड, नाहकचा दंगा, गोंधळ, गडबड नको. खेळीमेळीने हास्यविनोदात चांगल्या गोष्टींच्या स्मरण करताना जेवणाची थाळी संपवणे आवश्यक आहे.
या नियमांचे पण करा पालन
आयुर्वेदानुसार, जेवताना पायात जोडे, बूट नको. कारण पायात जर बूट, शूज असेल तर पायातून उष्णता बाहेर पडेल आणि पाचन अग्नि मंद होईल. हातपाय स्वच्छ धुवून मगच जेवायला हवे. जेवणापूर्वी प्रार्थना म्हणावी. इश्वराचे ध्यान करावे. जेवणाविषयी, ते तयार करणाऱ्याविषयी आणि ज्याच्यामुळे मिळाले त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. जेवणापूर्वी कमीत कमी 2-3 तासांअगोदर पाणी प्या. मांडी घालून, भारतीय बैठक पद्धतीने जेवण करणे हे आरोग्यासाठी चांगले आहे.
मानसिक स्थिती असावी आनंदी
जेवतेवेळी नाहकचा दबाव, चिंता, दडपण नको. जेवताना आनंदी राहा. नकारात्मक भावना, विचार यांना थारा देऊ नका. त्यामुळे पाचन रस पाझरत नाही. अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळे पुढे व्याधी बळवतात. भूक लागत नाही. चिडचिड वाढते. अपचण आणि गॅसचा त्रास वाढतो.
जेवणाची योग्य वेळ असावी
आयुर्वेदानुसार, अवेळी जेवू नये. भोजनाची योग्य वेळ असावी आणि ती पाळावी. जेवताना आनंदी राहा. दुपारी 12 ते 2 या दरम्यान जेवण करावे. त्यामुळे शरीराला ताकद मिळते. जेवण पण व्यवस्थित पचण होते. पोषक तत्व शरीराला मिळतात. तर भरपेट जेवणाची सवय योग्य नसल्याचे आयुर्वेद सांगते. जेवण करताना एक तृतीयांश आणि एक चतुर्थांश भाग खाली असणे आरोग्यासाठी लाभदायक असते.