भारताने मॉक ड्रीलची रंगीत तालीम करण्याचे जाहीर करीत पाकिस्तानला गाफील ठेवले आणि मॉकड्रीलच्या पूर्व संध्येलाच पाकिस्तानला धडा शिकवला. या हल्ल्यात भारताने आपली सीमारेषा ओलांडून १०० किमी आत जाऊन मोठे हल्ले केल्याने पाकिस्तानचे नाक ठेचले गेले आहे. पहलगामच्या बदल्यानंतर पाकिस्तानच्या सत्तेचे खरे मानकरी असलेल्या पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीर दडी मारुन बसले आहेत. त्यांनी या सर्व घटनाक्रमावर मौन बाळगले आहे. त्यामुळे ही त्यांची रणनीती आहे की भारतीय सैन्याच्या ताकदीपुढे शरणागती आहे याविषयी चर्चा होत आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे सकाळी पिकनिकचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने २६ पर्यटकांचा हकनाक बळी गेला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवायच्या तयारीत भारत होता. परंतू भारताने संपूर्ण पाकिस्तानला सावध करुन हा हल्ला केल्याने या हल्ल्याने युद्ध रणनितीकारक चकीत झाले आहेत. या हल्ल्याला ऑपरेशन सिंधुर हे नावही समर्पक देण्यात आले आहे.या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी युद्धाची सुरुवात म्हटले आहे आणि जबाबी कारवाई करण्याची दर्पोक्ती केली आहे. परंतू एरव्ही ऊठसुठ टीव्हीवर चमकणारे पाकचे सैन्य प्रमुख असीम मुनीर यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही हे विशेष…
जनरल असीम मुनीर यांच्या मौनामागे काही त्यांना सैन्यातून समर्थन मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. रिटायर्ड मेजर जनरल राजन कोचर यांनी यासंदर्भात मत मांडताना सांगितले की पाकिस्तानी सैन्यातील अनेक महत्वाचे अधिकारी मुनीर यांच्या नेतृ्त्वावर नाराज आहेत. कारण सध्याच्या संकटात निर्णायक पावले उचलण्या ऐवजी ते पाठी राहणे पसंद करीत आहेत. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या सैन्य आणि राजकीय नेतृत्वाची कमजोरीला पुन्हा एकदा जगापुढे उघडी पडली आहे.
भारताच्या अनपेक्षित प्रत्युत्तराने घाबरलेल्या पंजाब प्रांतात आपात्कालिन स्थिती लागू केली आहे, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांची देहबोलीतून त्यांची स्थिती समजून येत आहे. असीम मुनीर संपूर्णपणे दबावाखाली आहेत. त्यांच्या मौनामुळे पाकिस्तानात अंतर्गत सामंजस्यांची कमरता असल्याचे भारतीय तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी म्हटले आहे.
इमरान खान यांच्या समर्थकांनी सैन्य प्रमुख असीम मुनीर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी जनरल मुनीर यांच्या तानाशाही आणि निजी महत्वाकांक्षेमुळे देशाची युद्ध करण्याची परिस्थिती नसताना भारताचे संकट ओढवून घेतल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत. या मुद्यांवर सरकारने बोलावलेल्या बैठकांना देखील इमरान खान यांच्या पक्षाने बहिष्कार टाकला आहे.
असीम मुनीर यांच्या मौनावर केवळ भारताने दिलेल्या सैन्य प्रतिक्रीयेचा परिणाम म्हणत नाही. आता पाकिस्तानी अंतर्गत राजकीय स्थिती पाहाता मुनीर कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. पाकिस्तानची पाताळयंत्री गुप्तचर संघटना इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) मुनीर यांना दूर करणार की आणखी काही खेळी करुन स्वत: पायावर धोंडा पाडून घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.