रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेताच पत्नी रितिका सजदेह झाली व्यक्त, म्हणाली…
GH News May 08, 2025 12:07 AM

रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. जून महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार या भ्रमात क्रीडाप्रेमी होते. मात्र अचानक रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्रत्येक जण असं अचानक कसं काय झालं? असा प्रश्न करून व्यक्त होत आहे. रोहित शर्मा सध्या 38 वर्षांचा असून त्याने 67 कसोटी सामन्यात 4301 धावा केल्या आहेत. यात त्याने 12 शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ही 40.57 इतकी आहे. रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करताना सोशल मीडियावर लिहिलं की, ‘सर्वांना नमस्कार, मी कसोटीतून निवृत्त झालो आहे हे तुमच्यासोबत शेअर करायच आहे. पांढऱ्या कपड्यात कसोटीत देशाचं नेतृत्व करणं ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. तुम्ही इतकी वर्षे दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. मी भारताचं वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करणार आहे.’ असं असताना रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितिका सजदेरने रोहित शर्माची पोस्ट आपल्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे. तसेच त्या पोस्ट खाली हृदय भंग झाल्याचे इमोजी टाकले आहेत. तसेच एका इमोजीतून सलाम ठोकला आहे. तर एका इमोजीत डोळ्यात पाणी दिसत आहे. या चार इमोजीवरून रितिका व्यक्त झाली आहे. मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर वनडे आणि कसोटी खेळणार हे स्पष्ट केलं होतं. पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार ही चर्चा रंगली होती. तत्पूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

Ritika_Post

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर वनडे क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच रोहित शर्मा 2027 साली होणाऱ्या वनडे वर्ल्डकप संघात असेल आणि नेतृत्व करेल असे संकेत मिळत आहेत. पण आता याबाबत येणाऱ्या काळात काय ते स्पष्ट होईल. रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस या दोन गोष्टी वनडे वर्ल्डकपसाठी महत्त्वाच्या ठरतील. या दरम्यान होणाऱ्या वनडे मालिका रोहित शर्मच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.