पाकिस्तानमधील कोणती 12 शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली? 50 ड्रोन हल्ल्याचे लक्ष्य काय होते?
GH News May 08, 2025 05:07 PM

Serial Bomb Blast: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यानंतर आता गुरुवारी पाकिस्तानात बॉम्बस्फोटांच्या बातम्या येत आहेत. गुरुवारी सकाळीपासून पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी हादहले आहेत. या बॉम्बस्फोटांचे केंद्र पाकिस्तानमधील लष्करी केंद्र असल्याचे दिसून येत आहे. सकाळी लाहोरमध्ये स्फोट झाल्यानंतर कराचीमध्ये मोठा स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर वाढत्या तणावादरम्यान ही घटना घडली आहे. पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले झाले. परंतु हे स्फोट कोणाकडून झाले, त्याची माहिती दिली गेली नाही.

पाकिस्तानमधील लाहोरमध्येही जोरदार बॉम्बस्फोट झाला होता. लाहोरमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. पण कराचीमध्ये एक स्फोट झाला आहे. कराचीमध्ये सायरन वाजत असल्याचे वृत्त आहे. आणि शहरातील अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रावळपिंडीत स्फोट झाला आहे. या ठिकाणी लष्करी मुख्यालय आणि नौदलाचा तळाजवळ स्फोट झाला.

पाकिस्तानमधील 12 शहरात ड्रोन हल्ले झाले आहे. यामुळे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्ण अपयशी ठरली आहे. रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटनंतर मोठी अफरातफर निर्माण झाली आहे. ड्रोन स्फोटानंतर संपूर्ण भागात घबराट पसरली आहे. सैन्याने संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला आहे.

स्फोटाच्या आवाजानंतर सायरन वाजू लागले. त्यानंतर नागरिक घराबाहेर आले. या घटनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. स्थानिक रिपोर्टनुसार, ड्रोन हल्ल्यानंतर सियालकोट, कराची, लोहर विमानतळे बंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील कोणकोणत्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट

  • कराची
  • लाहोर
  • रावलपिंडी
  • उमरकोट
  • सियालकोट
  • गुजरानवाला
  • चकवाल
  • रवाल
  • बहावलपूर
  • चकवाल
  • शेखुपुरा
  • घोटकी

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपेशन सिंदूर ही मोहीम राबवली होती. या मोहीमेत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली. त्यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. त्याचा धसका पाकिस्तानमधील नागरिकांनी घेतला आहे. त्यात गुरुवारी साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यासंदर्भात अधिकृत माहिती अजून पाकिस्तानकडून देण्यात आली नाही.

हे ही वाचा…

‘ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही…’ भारत सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीतून पाकिस्तानला मोठा संदेश?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.