भारतीय नागरिक 7 मे 2025 ही तारीख कधीच विसरणार नाहीत. भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा हिशोब बरोबर केला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय घेतला. रोहितने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. रोहितने टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटला अलविदा केला होता. रोहितने त्याच स्टाईलने आता कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. तसेच रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार की नाही? याबाबतही सांगितलंय.
रोहितने इंस्टा स्टोरीद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. रोहितने या पोस्टमधून मनातील भावना व्यक्त केली. तसेच रोहितने या पोस्टद्वारे आपला फ्यूचर प्लानही सांगितला. रोहितने इंस्टा स्टोरीतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोहितला यापुढे फक्त आयपीएल आणि वनडेमध्येच खेळताना पाहता येणार आहे.
“भारताचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं हा माझा सन्मान आहे. तुमच्या समर्थन आणि प्रेमासाठी मी तुमच ऋणी आहे”, अशा शब्दात रोहितने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं नमूद केलं. रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान रोहितची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशापक्रारे तडकाफडतकी निवृत्ती घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. रोहितने याआधी काही महिन्यांपूर्वी टी 20 क्रिकेटमधून अशाच प्रकारे निवृत होत असल्याचं जाहीर केलं होतं. रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. रोहितने त्या ऐतिहासिक विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला होता. तेव्हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोघांनीह टी 20i क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती.