कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याने 20 षटकात 6 गडी गमवून 179 धावा केल्या आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 2 विकेट राखून 19.4 षटकात जिंकला. या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा विजय आहे. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेले आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉनवे खातंही खोलू शकले नाहीत. उर्विल पटेलने पदार्पणाच्या सामन्यात 11 चेंडूत आक्रमक 31 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विन 8, रविंद्र जडेजा 19 धावा करून बाद झाले. त्यामुळे हा सामना कोलकात्याच्या पारड्यात झुकला होता. पण डेवॉल्ड ब्रेविस आणि शिवम दुबेने चांगली भागीदारी काली. डेवॉल्डने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 52 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने एका बाजुने मोर्चा सांभाळला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत डाव पुढे नेला. शिवम दुबेने 40 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार मारत 45 धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे स्थिती 8 चेंडूत 10 धावा अशी आली. नूर अहमदने दोन धावा केल्या आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली.
चेन्नई सुपर किंग्सला 6 चेंडूत विजयासाठी 8 धावांची गरज होती. स्ट्राईकला महेंद्रसिंह धोनी होता. तर अजिंक्य रहाणे शेवटचं षटक आंद्रे रसेलकडे सोपवलं. पहिल्याच चेंडूवर महेंद्रसिंह धोनी षटकार मारला. यासह सामना आपल्या पारड्यात खेचला. त्यामुळे 5 चेंडूत 2 धावांची गरज होती. दुसरा चेंडू निर्धाव गेला. म्हणजे धोनीने धाव घेतली नाही. तिसऱ्या तेंडूवर मात्र एक धाव घेतली आणि सामना बरोबरीत आणला. तीन चेंडूत एका धावाची गरज होती. कंबोजने चौथ्या चेंडूवर चौकार मारला आणि विजय मिळवून दिला.
कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गुरबाज आणि सुनील नरीन ही जोडी मैदानात उतरली होती. पण 11 धावांवरच गुरबाज बाद झाला. त्यानंतर सुनील नरीन 26 धावा करून तंबूत परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. अंगकृष रघुवंशी काही चालला नाही. त्याला फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं. मनिष पांडेन नाबाद 38 धावांची खेळी तर आंद्रे रसेल 21 चेंडतू 4 चौकार आणि 3 षटकार मारून 38 धावांवर बाद झाला. रिंकु या सामन्यातही फेल गेला. त्याला फक्त 9 धावा करता आल्या. तर रमणदीप सिंगने नाबाद 4 धावांची खेळी केली.
कोलकात्याला अजूनही प्लेऑफची पुसटशी संधी आहे. कोलकात्याचे एकूण 11 गुण आहेत आणि दोन सामने शिल्लक आहेत. पहिली दोन स्थान 16 गुण असल्याने गेल्यात जमा आहेत. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचं गणित उर्वरित दोन सामने जिंकले जर तरने पूर्ण होऊ शकते. पण पंजाब आणि मुंबईच्या पराभवावर हे अवलंबून असणार आहे.