बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. सध्या तो त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत'मुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच 'महाभारत' चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. आमिर खानने त्याला चित्रपटात कोणती भूमिका करायला आवडेल याचा खुलासा देखील केला आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
एका मिडिया मुलाखतीत म्हणाला की, "महाभारत हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. त्यामुळे मी याकडे खूप लक्ष देऊन काम करत आहे. माझा आगामी चित्रपट रिलीज झाल्यावर मी महाभारत प्रोजेक्टवर काम करेन. मी माझं बेस्ट देईन." पुढे आमिरला 'महाभारत' चित्रपटातील भूमिकांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, "मला स्वतःला भूमिका करायला नक्कीच आवडेल. ही भूमिका खूप आकर्षित आणि स्ट्राँग आहे. "
आमिर खानने सांगितल्यानुसार, '' चित्रपटाचे दोन भाग बनणार आहेत. 'महाभारत' हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही आहे. आता 'महाभारत' चित्रपटात आमिर खान कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सितारे जमीन परआमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'च्या कामामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानचा 'तारे जमीन पर' चित्रपट 2007 साली रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. 'सितारे जमीन पर' हा 'तारे जमीन पर'चा सीक्वेल आहे. 'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत जिनिलिया देशमुख देखील झळकणार आहे.