प्रेक्षकांना रविवारी मालिकांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या आवडत्या मालिकांचे विशेष महारविवार पाहता येणार आहेत. 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिकेत कोर्टात वल्लरीचा सत्यासाठीचा लढा सुरू होणार आहे तर 'इंद्रायणी' (Indrayani) मालिकेत इंद्रायणीच्या शिक्षणासाठी चाललेल्या संघर्षाला नवी झेप मिळणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' आणि 'इंद्रायणी' मालिकांचे 11 मे ला महारविवार विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.
'' मालिकेत इंदूच्या शाळेच्या प्रवासाला पुढची पायरी येणार आहे. इंद्रायणीचा विठूच्या वाडीत शाळा उघडणे हा एक ध्यास आहे. इंदूला एका वर्षात गावात शाळा उघडायची आहे. मोहित रावनी दिलेले आव्हान इंद्रायणीने स्वीकारले असून आता ते पूर्ण करण्यासाठी तिच्या गँगच्या मदतीने इंदू वर्गणी गोळा करताना दिसणार आहे. पण, यातच मोहितराव इंद्रायणीच्या हातात एक रुपयाचे नाणे ठेवत तिला हिणवतो. म्हणतो की, "असेच पैसे गोळा केलेस तर होईल शाळा सुरु १०० वर्षांत"
इंदूच्या मनाला मोहित रावाचं म्हणणं खूप लागते आणि इंदू ठरवते सुरू करण्यासाठी सगळी पंचक्रोशी हजर करणार आहे. इंदू २४ तास नामाचा गजर करणार आहे. विठूच्या वाडीतील लोकांमध्ये शाळेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी इंदूचा हा अनोखा प्रयोग सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. इंद्रायणीच्या या प्रयत्नांमध्ये आनंदीबाई, करिष्मा, मोहीतराव कसे अडथळे आणणार आणि इंदू पुढे काय करणार? हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा'मालिकेत श्वेता आणि मिठूला न्याय मिळवून देण्यासाठी वल्लरी सज्ज आहे. तिला पिंगा गर्ल्सची खंबीर साथ मिळणार आहे. अनिमेश आणि वल्लरी एकमेकांसमोर येणार आहेत. कोर्टात अनिमेशचा पर्दाफाश होणार आहे.वल्लरी अखेर न्याय मिळवून देणार आहे. सत्याचा विजय होणार आहे. पिंगा गर्ल्स वेळेत कोर्टात पोहचू शकतील? वल्लरी हे सगळं कसं करणार? कसा अनिमेशचा खरा चेहरा समोर आणणार? हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे.
'इंद्रायणी' मालिकेचा 11 मेचा महारविवारचा विशेष भाग कलर्स मराठीवर दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळणार आहे. तर 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेचा विशेष भाग दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता पाहता येणार आहे.