बीड शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सारडा कॅपिटलमधील एका तळघरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय चालू होता.
याबाबतची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून काल रात्री ८ वाजेच्या सुमारास कारवाई केली.
यामध्ये चालकाला बेड्या ठोकल्या असून नाशिकच्या एका पीडित महिलेची सुटका देखील केली आहे.
बीड शहरातील सारडा कॅपिटल परिसरात तळघरात ब्लीस स्पा नावाचे स्पा सेंटर आहे.
याच ठिकाणी मागील काही दिवसांपासून वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती होती.
माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. यात एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे.
Jalna: जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने आज शहराला पाणीपुरवठा होणार नाहीजालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरील पाईपलाईन अंबड - पैठण मार्गावर फुटली आहे.
त्यामुळे आज जालना शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाहीये. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय.
जायकवाडी ते जालना पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यातच आता पुन्हा अंबड - पैठण मार्गावर पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे आज शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे असं महापालिकेकडून कळविण्यात आलंय.
मराठवाडा होतोय टँकरवाडा, मराठवाड्यातील आठ जिल्हयांतील 278 गावांना 433 टँकरने पाणी...मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील 278 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे . मराठवाड्यातील 278 गावांची आणि 99 वाड्यांची 433 टँकर ने तहान भागवली जात आहे. तर नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने 755 विहिरीचे अधिग्रहण देखील केले आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 177 गावे आणि 31 वाड्यांसाठी 257 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
चक्री वादळाने केळी पिकांचे प्रचंड नुकसान, संग्रामपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची केळी जमीनदोस्तकाल रात्री संग्रामपूर व जळगावजामोद तालुक्यात प्रचंड चक्रवादळाचा तडाखा केळी पिकाला बसलाय, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पिकांचे मोठता प्रमाणात नुकसान झाले असून शेतातील केळी जमीनदोस्त झालेली पाहायला मिळाली... बावणबीर येथील विजय काळपांडे यांच्या शेतातील केळी काढण्यावर आली असताना अचानक अवकाळी वादळी पाऊस झाला त्यात चक्रीवादळ आले त्यात त्यांची 3 एकरातील केळी पूर्णतः उध्वस्त झाली आहे.. तालुक्यातील शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसीलदार यांची भेट घेऊन तात्काल पंचनामे करून आर्थिक मदत करावी अश्या आशयाचे निवेदन देऊन मागणी केली आहे...
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावतीच्या दौऱ्यावर, विदर्भातील सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराची करणार पायाभरणीराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अमरावतीच्या रेवसा मधील मालू सिटी मध्ये विदर्भातील सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचे भूमिपूजन होणार आहे..
मंदिराच्या भूमिपूजनाला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहे
तब्बल एक लाख स्केअर फुटावर होणार इस्कॉन मंदिराची उभारणी.. विदर्भातील सर्वात मोठे असणार इस्कॉन मंदिर
मंदिरा बरोबरच गोशाळा, वाचनालय,विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका व गुरुकुलाची निर्मिती होणार.
50 ते 60 कोटी रुपये खर्च करून दानातून उभारले जात आहे इस्कॉन मंदिर, या मंदिरासाठी अडीच एकर जागा प्रवीण मालू यांनी दान दिली आहे..
मंदिरामुळे अमरावतीच्या संस्कृतीला पर्यटनाला चालना मिळणार आहे.
थकबाकीमुळे वीज खंडित, ‘महावितरण’कडून पुणे विभागात ४१ हजार ग्राहकांवर कारवाईमहावितरण’च्या पुणे विभागातील लघुदाब वीज ग्राहकांकडे ४६ कोटी रुपयांची थकबाकी असून, ती वसूल करण्यासाठी सुमारे ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी ही माहिती दिली. ‘महावितरण’च्या पुणे विभागाची आढावा बैठक गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये झाली.
अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १९ मेपासून; माहिती भरणं ८ मेपासून सुरूशालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून, विद्यालयांना आवश्यक माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया ८ मेपासून सुरू होईल.
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा १९ मेपासून सुरू होणार आहे.
आठवड्यातून एक दिवस कामावर जाताना पीएमपीतून प्रवास करा; सर्व विभाग प्रमुखांना पी एम पी अध्यक्षांचे आदेशप्रत्येक बस स्थानकांवर जाऊन तपासणी करण्याचे ही आदेश
यापूर्वी तत्कालीन अध्यक्ष सचिन रतापसिंह यांनी केला होता प्रयोग
प्रत्येक विभाग प्रमुखांना एक डेपो दत्तक दिला होता आणि त्यांना सगळ्या पहाणीचे आदेश दिले होते
तोच प्रयोगाचा पीएमपी प्रशासनाकडून पुन्हा राबविण्यात येतोय
प्रवाशांच्या सगळ्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी हा आदेश सगळ्या पीएमपी कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
Pune: पुण्यात फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली, रेल्वेने प्रवास करणारे साडेतीन लाख फुकटे प्रवासीया प्रवाशांकडून रेल्वेने वसूल केला 19 कोटींचा दंड
दोन लाखाहून अधिक प्रवासी विना तिकीट आणि 67 हजार हून अधिक प्रवासी बेकायदा प्रवास अशा अनेक प्रवाशांकडनं रेल्वे विभागाने वसूल केला दंड
पुणे रेल्वे विभागातील पुणे ..सातारा ..कराड.. मिरज ..कोल्हापूर या स्थानकांचा समावेश
Pune News: पुण्यातील डी जे मेडिकल कॉलेजचा रॅगिंग अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला सादरबी जे मेडिकल कॉलेज मधील डॉक्टर गिरीश बारटक्के यांना विभाग प्रमुख पदावरून हटवलं
बी जे वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यावर रॅगिंग प्रकरण केल्याचे समोर आले होते
विद्यार्थ्यांच्या आईने की तक्रार वैद्यकीय शिक्षण विभाग आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांच्याकडे केली होती.
त्यानुसार तीन विद्यार्थ्यांना एका सेमिस्टर साठी निलंबित करण्यात आले आहे
या रॅगिंग प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे
28 एप्रिल पासून सुरू असलेली सगळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय
Pune: पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन बांगलादेशींना एटीएसने पकडलंपुणे ग्रामीण मधील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेले बांगलादेशी ताजमीर मोश्ताफा अन्सारी वय - 29 वर्ष, यास ओतूर पोलीस स्टेशन चे अधिकारी व स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडे विचारपूस करून त्याचा बांगलादेशी मित्र नामे मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी वय 28 वर्ष दोघेही रा. ओतूर बांगलादेश मूळ रा. बोकराई जिल्हा शारखीरा बांगलादेश यांना ओतूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
त्यांच्या कडून भारतीय बनावट आधार कार्ड. पॅनकार्ड. ड्रायव्हिंग लायसन्स. मोबाईल हँडसेट, आणि दोघांचे बांगलादेशी पासपोर्ट विसा संपलेले जप्त केले आहेत.
सदर कारवाई आमचे मार्गदर्शना नुसार API दत्तात्रय दराडे. HC शरद जाधव आणि PC तांदळवाडे यांनी ओतूर पो स्टे मार्फत केली.
Yerwada Bridge: येरवडा पूल वाहतुकीसाठी बंद करावा ही काँग्रेसची मागणीयेरवडा पर्णकुटी चौक व कोरेगाव पार्क भागाला जोडणाऱ्या अतिसंवेदनशील व शेकडो लोकांच्या जीवास धोकादायक असणाऱ्या श्री तारकेश्वर पुलाला चार दिवसा पूर्वी भगदाडा पडले होते.तरी देखील पालिकेने तात्पुरती नावाला डागडुजी करून पूल चालू केला पण नागरिकांचा जीव धोक्यात आहे, एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि यापुढेही करत राहू मात्र प्रशासनाने देखील तेवढे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून विषयांच्या मुळाशी जाऊन समस्या दूर केली पाहिजे ही चं अपेक्षा आहे. तो पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा ही मागणी काँग्रेसचे वडगावशेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी केली आहे
Washim: वाशिम शहरात साचले कचऱ्याचे ढिग, नगर पालिकेचे दुर्लक्षवाशिम शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत,फेरीवाले मोठ्या प्रमाणात जवळचा कचरा कुठेही फेकत असल्यामुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ठीक साचले आहेत. या फेरीवाल्यांकडे वाशिम नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे या कचऱ्याला आग लागण्याच्या घटना सुद्धा घडत आहेत. याकडे पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करून कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी होतिये
Latur: उदगीरमध्ये शॉर्ट सर्किट मुळे जनावरांच्या गोट्याला आग, आगीत एक जनावर जळून खाकलातूरच्या उदगीर तालुक्यातील किनियल्लादेवी शिवारात शेतकरी तुकाराम देवकते यांच्या शेतातील जनावरांच्या गोट्याला शॉट सर्किट मुळे भीषण आग लागली, अजित जनावरांच्या चाऱ्यासह शेतीचे साहित्य, आणि एका जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय, अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणले मात्र आगीत शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्याने आता मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे...
Nanded: नांदेडमध्ये कृषी सहाय्यकाचे विविध मागण्यासाठी आंदोलननांदेडमध्ये कृषी सहाय्यकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात यावा, कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
आयुष्यमान भारतसाठी ई-केवायसी करा, जिल्हाभरात 15 मे पर्यंत मोफत सेवाधाराशिव जिल्ह्यात आयुष्यमान भारत,पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराब फुले जन आरोग्य योजनेच्या एकञित लाभासाठी लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्यात येणार आहे.या अनुषंगाने 15 मे पर्यंत जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.वाडी, वस्ती,शाळा,महाविद्यालये जाऊन ही सेवा देण्यात येत असुन जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
भारतीय सैन्य दलाने केलेल्या उत्तुंग कामगिरी बद्दल साताऱ्यात भाजपाकडून महाआरतीचे आयोजन"ऑपरेशन सिंदूर" या नावाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करून नऊ तळ उध्वस्त केले.
संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशा या कामगिरीबद्दल साताऱ्यात भारतीय जनता पार्टी तर्फे साताऱ्यातील श्री पंचमुखी गणपती मंदिर या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सैन्यदलाचे अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे सैन्य दलाचे मनोबल वाढावे आणि त्यांनी अजून आत घुसून पाकिस्तानला धडा शिकवावा अशा शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या माजी नेत्या प्रीती बंड आज शिंदेंच्या शिवसेनात करणार पक्षप्रवेशआपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार...
प्रीती बंड यांनी अमरावती शहरात लावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स.
प्रीती बंड यांनी 2014 आणि 2019 मध्ये आमदार रवी राणा आणि विरोधात लढवली आहे निवडणूक..
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता..
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ठाकरे गटाने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती... त्यामुळे त्यांना ठाकरे गटांने निलंबित केल आहे.
दरम्यान आता प्रीती बंड या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे..
प्रीती बंड या दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत.
कळंब तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलनधाराशिव च्या कळंब येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
कृषी सेवक कालावधी रद्द करुन कृषी सेवकांना नियमीत कृषी सहायक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहाय्यकाचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी अधिकारी करावे, कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर मदतीसाठी कृषी मदतणीस द्यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.
Jalna: जालन्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कॉर्टरमध्ये चोरी करणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यातजालना शहरातल्या मोतीबाग परिसरात असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कॉर्टर मधून एसी आणि इन्व्हर्टर चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलय.
सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने या शासकीय निवासस्थानामध्ये कोणीही राहत नसल्याचा फायदा या चोरट्यांनी घेतला आणि थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या कॉर्टर मधून एसी आणि इन्व्हर्टर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी सखोल चौकशी करत या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हा सर्व मुद्देमाल जप्त केला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ulhasnagar: भर पावसात धुळीवर पाणी मारायला निघाली गाडी, उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभारउल्हासनगर शहरात बुधवारी एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असतानाच दुसरीकडे महानगरपालिकेची धुळीवर पाणी मारणारी गाडी शहरात पाण्याचे फवारे मारत फिरत होती.
या अजब प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उल्हासनगर शहरात भुयारी गटार योजनेची कामं सुरू असून त्यासाठी रस्ते खोदले जातायत.
यामुळे रस्त्यावर उडणाऱ्या धुळीचा नागरिकांना त्रास होऊ नये, या हेतूने शहरात रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारणारी गाडी फिरत असते.
परंतु बुधवारी शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असतानाही ही गाडी पाण्याचे फवारे मारत फिरत असल्यामुळे ही कर्मचाऱ्यांची अतितत्परता म्हणायची की बिनडोकपणा? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.