पाकिस्तानात गेल्या दोन दिवसांपासून दिवसरात्र पाकड्यांची झोप उडाली आहे. पाकिस्तानमध्ये ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानातील प्रमुख शहरात कानठळ्या बसणारे स्फोट झाले आहेत. एकूण 50 ठिकाणी स्फोट झाले आहेत. पाकिस्तानच्या 12 शहरांवर भारताने हा हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने वारंवार सीमा रेषेवर कुरापती आणि गोळीबार करण्यात येत आहे. तोफ गोळे डागण्यात येत आहे. तर भारताच्या 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे भारताने लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टमच उद्ध्वस्त केली आहे. भारताने पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली, रडार प्रणाली नष्ट केली आहे. पाकिस्तानला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानण्यात येत आहे.
पाकिस्तानची आगळीक हाणून पाडली
पाकिस्तानने भारताच्या अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूरा, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरालाई आणि भुज या शहरांवर आणि तिथल्या भारतीय लष्करी तळावर हल्ला करण्याचा पाकड्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. भारताच्या एअर डिफेंस सिस्टमने ड्रोन हल्ले हाणून पाडले.
पाकची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट
भारताने पाकिस्तानातील लाहोर, कराचीच नाही तर इतर शहरातील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली. पाकिस्तानच्या आगळकीला थेट प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या या पलटवाराने पाकिस्तानचे हातपाय गळाले आहे. पाकिस्ताने अजून आगळीक केली तर त्याला तोडीस तोड उत्तर देणार असा इशारा भारताने दिला आहे.
S-400 सिस्टिमने कामगिरी चोख बजावली
पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांना लक्ष्य केले होते. भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने या शहरांवर मिसाईल सोडली होती. पण त्याअगोदरच रशियाकडून खरेदी केलेली S-400 ही संरक्षण प्रणाली उपयोगी पडली. या सिस्टिमने तिची कामगिरी चोख बजावली. पहिल्यांदाच ही प्रणाली उपयोगात आणण्यात आली तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानच्या विविध शहरातील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली. याविषयीची अधिकृत माहिती एका निवेदनाद्वारे भारताने दिली आहे.
हार्पी ड्रोनचा भारताकडून वापर
इस्त्रायलकडून भारताने खरेदी केलेल्या हार्पी ड्रोनने आज चोख कामगिरी बजावली. पाकिस्तानातील 12 शहरांतील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. लाहोरमध्ये सर्वाधिक हल्ले करण्यात आले. या शहरावर भारताने अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. लष्करी तळाजवळ हे हल्ले झाले. या शहरात सकाळपासूनच सायरन वाजत आहे. नागरिकांची पळापळ सुरू आहे.
या शहरात भारताचे हल्ले
गुजराणवाला
चकवाल
बहावलपूर
मियानो
कराची
छोर
रावळपिंडी