Operation Sindoor : मुंबई इंडियन्सचा IPL 2025 मधील सामना दुसरीकडे हलवला, BCCI चा निर्णय; PBKS vs MI मॅच कुठे होणार ते वाचा...
esakal May 08, 2025 11:45 PM

Operation Sindoor नंतर देशातील सीमालगतच्या विमानतळ बंद करण्यात आल्या आहेत. चंदीगढ विमानतळ १० मे पर्यंत बंद असल्याने मुंबई इंडियन्सला तिथे पोहोचणे अवघड झाले होते. अशात हा सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. IPL 2025 मधील ११ मे रोजी होणारा पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( PBKS vs MI) यांच्यातील सामना धर्मशाला येथे होणार होता, मात्र तो आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

BCCI कडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण, PTI ने या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. दोन आठवड्यांपूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर ही विशेष मोहिम राबवली आणि त्यानंतर भारतातील काही प्रमुख ठिकाणांवर रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळेच धर्मशालाचा सामना दुसरीकडे होणार आहे.

 १२ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह चौथे स्थान कायम राखले आहे. पण, त्यांना प्ले ऑफसाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकाव्या लागणार आहेत. त्यांचा पुढील सामना पंजाब किंग्सविरुद्ध धर्मशाला येथे होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर धर्मशाला येथे जाणारी सर्व विमानं १० मे पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. अशात ११ मे रोजी PBKS vs MI लढत कशी होईल, या प्रश्न होता. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचा संघ धर्मशाला ऐवजी अहमदाबाद येथे खेळवण्याचा निर्णय झाला आहे.

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी ११ मे रोजी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना अहमदाबाद येथे होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याभारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत कुरापती सुरू आहेत. गेल्या १४ दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार केला जात आहे. कुपवाडा, बारामुल्ला, उरी, अखनूरसह पूँछमध्ये पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी झाले आहेत. यात चार मुलांचा आणि एका जवानाचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.