Jammu Drone Attack : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आल्याची ताजी माहिती आहे. जम्मूच्या विमानतळावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानचे ८ ड्रोन भारताच्या एस ४०० या एअर डिफेन्स सिस्टिमनं पाडले आहेत. त्याचबरोबर स्फोटांचे आवाज आल्यानंतर संपूर्ण राज्यात ब्लॅक आऊटचे आदेश देण्यात आले आहेत.
एएनआयच्या माहितीनुसार, जम्मूच्या अखनूर भागात पूर्णपणे ब्लॅक आऊट करण्यात आला आहे, तसंच सर्वत्र सायरन ऐकायला मिळत आहेत. पठाणकोटच्या एअरबेसनंही पाकिस्तानी ड्रोन्सही हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जम्मू विद्यापीठाजवळ एक क्षेपणास्त्र पाडण्यात आलं आहे. तसंच उधमपूर आणि अखनूर इथं काही ड्रोन्स पाडण्यात आली आहे. तसंच राजस्थानच्या सीमेवरही ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून सीमाभागांमध्ये ड्रोन हल्ले सुरु केल्यानं भारताची एअर डिफेन्स सिस्टिम S400 अॅक्टिव्ह झाली आहे. या सिस्टिमनं पाकिस्तानचे ८ ड्रोन्स पाडल्याचं वृत्त आहे. त्याचबरोबर जम्मू विमानतळावरुन भारताचे दोन फायटर जेट विमानं पाकिस्तानच्या दिशेनं झेपावले आहेत.
जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये पूर्णपणे ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा भागातही पूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आला आह. सांबा आणि कुपवाडात गोळीबारही सुरु आहे. त्याचबरोबर पंजाबच्या अमृतसरमध्येही ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. दरम्यान, राजस्थानातील जैसरमेर इथं पाकिस्तानंच F-16 विमान पाडल्याचं टीव्ही मीडियानं सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.