पाकिस्तानच्या हवाई दलाचा एक पायलट गुरुवारी भारतीय सुरक्षा दलाच्या हाती लागला आहे. हा पायलट त्याच्या लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर जैसलमेरमध्ये उतरला होता, अशी माहिती मिळाली आहे.
पायलट नेमका कोणत्या कारणामुळे विमानातून बाहेर पडला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी ‘द ट्रिब्यून’ वृत्तपत्राला या वृत्ताची खात्री दिली आहे. विमानातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षा दलांनी तत्काळ या पायलटला ताब्यात घेतले.
पकडलेल्या पायलटची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणा या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. सीमावर्ती भागात ही घटना घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे.