IWill IPL 2025 be suspended amid India-Pak tensions?: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम आता आयपीएलवर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयपीएल रद्द करण्याचा तसेच विदेशी खेळाडूंना परत पाठवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
धर्मशाळा येथील सामना रद्दसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंची सुरक्षितता ही बीसीसीआयची प्राथमिकता आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आज धर्मशाळा येथे सुरु असलेला सामनाही रद्द करण्यात आला आहे. तसेच खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
या खेळाडूंना तसेच इतर कर्मचाऱ्यांना दिल्ली जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.
बीसीसीआयच्या निर्णयाकडे लक्षभारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे आयपीएल 2025 च्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
बीसीसीआय लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आता काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.