पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला जोरदार उत्तर देण्यात आलं. भारताने पाकड्यांच्या नांग्या ठेचत 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. मात्र त्यानंतरही शेजारी धजावत नाहीत. त्यामुळे भारताकडून प्रत्युत्तरात पाकिस्तावर जोरदार केली जात आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान कंगाल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांना आणखी एक झटका लागला आहे. यूएई क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीगमधील उर्वरित सामन्यांच्या आयोजनावरुन स्पष्ट नकार देत शेजाऱ्यांना तोंडावर पाडलं आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाचा परिणाम हा क्रिकेटवर झालाय. भारताने पाकिस्तानच्या कुरापतीच्या प्रत्युत्तरात 8 मे रोजी ड्रोनद्वारे कारवाई केली. यात पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्धवस्त झालं. त्यामुळे पीएसएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन हे कराचीमध्ये करण्यात येणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र त्यानंतर पाकिस्तान आणखी उद्धवस्त झाला. त्यामुळे उर्वरित सामने हे यूएईमध्ये आयोजन केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाने पीसीएलच्या आयोजनावरुन स्पष्ट नकार देत पाकिस्तानला तोंडावर पाडलं आहे.
पीसीबीने रावळपिंडी स्टेडियम उद्धवस्त झाल्याने 8 मे रोजी होणारा सामना रद्द केला. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धाच स्थगित करण्यात आली. त्यानंतर पीसीबीने उर्वरित 8 सामने हे यूएईमध्ये आयोजित केले जातील असं स्पष्ट केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीनतर यूएई क्रिकेट बोर्ड देशात पीएसएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी तयार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईमध्ये मोठ्या प्रमाणात भारत आणि पाकिस्तानी नागरिक राहतात. त्यात तणावाच्या परिस्थितीत पीएसएलच्या आयोजनामुळे सुरक्षेचा मुद्दा उद्भवू शकतो. तसेच दोन्ही देशातील नागरिकांमध्ये वाद होऊ शकतो, अशी शक्यता या मीडिया रिपोट्समधून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान यूएई क्रिकेट बोर्डाचे बीसीसीआयसह चांगले संबंध आहेत. भारताने टी 20i वर्ल्ड कप, आशिया कप आणि आयपीएलसारख्या अनेक स्पर्धाचं आयोजन करण्याची संधी यूएईला दिली आहे. इतकंच नाही, तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताचे सर्व सामने हे दुबईत आयोजित करण्यात आले होते. भारतीय क्रिकेट सामन्यांमुळे यूएईला अनेक माध्यामांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला आहे. यूएईला याची चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे यूएई भविष्याचा विचार करुन पाकिस्तानला पीसीबीच्या आयोजनासाठी होकार न देण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पीएसएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन कुठे करणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.