भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देण्यात आला.
India Vs Pakistan Update : गुजरातमध्ये फटाक्यांना बंदीभारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात १५ मे पर्यंत फटाके आणि ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. गुजरात सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे गुजरातमधील सीमाभागातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
INd Vs Pak : सिद्धीविनायक, साईबाबांचे मंदिरही अलर्ट मोडवर; हार फुलांचेही होणार स्कॅनमुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबरोबरच आता शिर्डीतील साईबाबांचे मंदिरही अलर्ट मोडवर आलेले आहे. या दोन्ही मंदिरातील हार आणि फुलांचेही स्कॅन करण्यात येणार आहेत. मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तूंना सक्तीची बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व मंदिरांनाही अलर्ट देण्यात आलेला आहे.
IPL : आयपीएल काही काळासाठी स्थगितभारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती इंडियन प्रीमियर लीग काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. थोड्याच दिवसांत याबाबतचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
INd Vs Pak : मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी होतेपाकिस्तानकडून सीमेवर करण्यात आलेल्या गोळीबारात मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी असलेले जवान मुरली नाईक हे शहीद झाले आहेत. नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. ते घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये राहत होते. पाकिस्तानकडून आज सकाळी जम्मू परिसरात झालेल्या हल्ल्यात मुरली नाईक हे शहीद झाले आहेत. मुरली नाईक यांच्या हौतात्म्युळे कामराज नगरमध्ये शोककळा पसरली आहे.
पाकिस्तानचे मनसुबे भारताच्या लष्कराने उधळले : उमर अब्दुलापाकिस्तानकडून जम्मू शहरात ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या लष्कारांनी सर्व ड्रोन निकामी करत पाकिस्तानचा पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री नऊ वाजता आणि शुक्रवारी पहाटे पाकिस्तानकडून हल्ले झाले आहेत. पाकिस्तानने थोड्या अकलहुशारीने निर्णय घेतले पाहिजेत, असे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी सांगितले.
Ind Vs Pak : भारत-पाक युद्धाची आज सायंकाळी परराष्ट्र मंत्रालय देणार माहिती‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार घेणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतरही पकिस्तानमधील महत्वपूर्ण ठिकाणांवर भारताकडून क्षेपणास्त्रं डागली जात आहेत. त्याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे.
राजनाथ सिंहांनी घेतली लष्कराच्या तीनही प्रमुखांची बैठकभारत-पाकिस्तानाच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज आपला लखनौ दौरा पुढे ढकलला आहे. राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा तीनही दलाच्या लष्करप्रमुखांसोबत बैठक घेतली आहे.
Ajit Pawar live: अजितदादांनी हेलिकॉप्टरने जाणे टाळलंभारत-पाकिस्तानच्या तणावामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यास नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हेलिकॉप्टरने मुंबईला जाणे टाळले असल्याचे समजते. साताऱ्यावरुन ते मुंबईकडे गाडीने रवाना झाले आहेत.
India Pakistan Conflict Live: RSS कडून केंद्र सरकार आणि लष्कराच अभिनंदनभारताने पाकिस्तानला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र सरकार आणि लष्कराचे अभिनंदन करण्यात आले आहे. याबाबत आरएसएसकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदुर यशस्वी राबवल्याबद्दल आरएसएसने कौतुक केले आहे. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडात पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले, असे निवेदनात म्हटलं आहे.
India-Pakistan Conflict Live: महाराष्ट्र सरकारची तातडीची बैठकभारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्याहून बैठकीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणत्याही उणिवा राहणार नाहीत याचा आढावा सरकार घेणार आहे.
भारत-पाक तणाव आयपीएलचे सामने स्थगितभारत-पाक तणाव आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. गुरुवारी सुरू असलेल्या पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना अचानक थांबण्यात आला होता. हा सामना रद्द करताना दोन्ही संघालांना एक एक गुण देण्यात आले होते. आता आयपीएलमधील पुढील सामने स्थगित करण्यात आले आहेत.
: संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठकभारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठक बोलवली आहे. त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबच बैठक ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीवर त्यांची सैन्यदलाच्या प्रमुखांशी चर्चा होणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याने खळबळमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली माहिती, सकाळी सव्वा पाच वाजता साकीनाक्यातील हजरत तय्यद जलाल (बैगन शाहा दर्गा) मशिदीच्यावर ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती.ड्रोन त्यानंतर झोपडपट्टी परिसरात नाहीसा झाल्याचा कॉलरचा दावा . ड्रोन उडवणाऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू
सीए फायनल, इंटरमीडिएट, पीक्यूसी परीक्षा पुढे ढकलल्याइन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इंडिया कडून मोठी घोषणा देशातील तणावपूर्ण सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सीए फायनल, इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय. ९ मे २०२५ ते १४ मे २०२५ या काळात होणारे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा
पाकिस्तानला मदत देण्यासाठी आज आयएमएफची बैठकपाकिस्तानला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची (IMF) आज बैठक होणार आहे. पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या १.३ अब्ज डॉलर निधिला मान्यता देण्यावर आज होणार चर्चा. मात्र पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या निधीला भारताकडून केला जाणार प्रखर विरोध.
पाकिस्तानची आर्थिक मदतीसाठी याचना, कर्जासाठी विनंतीभारताच्या मोठ्या कारवाईनंतर पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे कर्जासाठी पसरले हात. या काळात पाकिस्तानला अधिक कर्ज देण्याच केलं आवाहन केले. वाढत्या युद्ध आणि साठ्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मतदीच आवाहन केले.
Delhi : दिल्लीतील महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवलीभारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महत्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल किल्ला, कुतुब मिनार परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच आता प्रवेश दिला जात आहे.
India-Pakistan War : मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठकभारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक पार पडली. नौदलाची ठिकाणं संवेदनशील ठिकाणी मच्छिमरांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या आदेश देण्यात आले आहेत. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे. पाकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेण्यात आल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. २६/११ प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणारदेशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. सीडीएस अनिल चौहान हे या बैठकीस उपस्थित राहणार असून भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती नेमकी काय असेल याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
भारतीय लष्कराकडून लाहोरमधील महत्वाची ठिकाणं लक्ष्यपाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्यानंचर भारतीय लष्कराने लाहोरमधील महत्वाची ठिकाणं लक्ष्य केली. यामध्ये सियालकोट शहराचा समावेश आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात वाहनांचे नुकसानजम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती शहरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात वाहने आणि दुकानांचे नुकसान झाले.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पहाटे पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू करण्यात आला. उरी, कुपवाडा, नौशेरा या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
India-Pakistan War : पाकिस्तानकडून एलओसीवर रात्रभर गोळीबारजम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्तानने जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर हा गोळीबार करण्यात आला आहे.
India-Pakistan War : भारताने थेट इस्लामाबादलाच केलं लक्ष्यभारताने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादलाच टार्गेट केलं आहे. ड्रोन आणि हवाई हल्ले करत भारताने रात्रभर पाकिस्तानची झोप उडवली आह. स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबादमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामाबादसह लाहोर आणि पेशावर येथेही भारतीय लष्कराने हल्ले केले आहेत.