पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांच्या 9 तळांवर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करत जोरदार दणका दिला. भारताने यात कोणत्याही नियमांचा भंग केला नाही. भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. मात्र दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने भारतावार ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने तो हल्ला परतवून लावला आणि शेजाऱ्यांचे नापाक मनसुबे उधळवून लावले. भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’अतंर्गंत ही कारवाई करण्यात आली. दोन्ही देशात 2 दिवसांपासून हल्ला-प्रतिहल्ला सुरु आहे. ही परिस्थिती पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना आवाहन केलं आहे.
भारत आणि पाकिस्तानतला तणाव कमी करा, असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना केलं आहे. सध्या दोन्ही देशात जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले सुरु आहेत. दोन्ही देशात सुरु असलेला हाच तणाव कमी करा, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.