रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) आणि अजय देवगणचा ( Ajay Devgn ) 'रेड 2' (Raid 2) चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने नुकताच १०० कोटींचा टप्पा केला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
आणि अजय देवगणचा '2' रिलीज होऊन आता 9 दिवस पूर्ण झाले आहेत. 9 दिवसात चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करायला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाने 9 व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला आहे, जाणून घेऊयात.
दिवस पहिला - 19.25 कोटी
दिवस दुसरा - 12 कोटी
दिवस तिसरा - 18 कोटी
दिवस चौथा - 22 कोटी
दिवस पाचवा - 7.50 कोटी
दिवस सहावा - 6.75 कोटी
दिवस सातवा - 4.52 कोटी
दिवस आठवा - 5.33 कोटी
दिवस नववा - 5 कोटी
एकूण - 100.75 कोटी
'रेड 2' चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. रितेश देशमुख आता लवकरच 'हाउसफुल 5'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. तर अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते वाट पाहत आहे. 'रेड 2' भविष्यात अनेक मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करेल असे बोले जात आहे.