उन्हाळ्याच्या ताजेपणासाठी योग्य गोडसर कलिंगड निवडण्याच्या या पद्धती लक्षात ठेवाच.
गडद आणि जवळजवळ पट्टे असलेलं कलिंगड अधिक गोड असतं. पसरलेले पट्टे अधिक पाणीदार असते व कमी चवदार असते.
खालच्या बाजूचा गडद पिवळा डाग म्हणजे कलिंगड पिकल्याचं लक्षण. पांढरा डाग म्हणजे कच्चं कलिंगड असते.
गोलसर कलिंगडामध्ये गोडवा अधिक असतो. आयताकृती कलिंगड अनेकदा पाणीदार आणि कमी गोड लागतं.
कलिंगड टॅप करताना खोल आवाज आला तर ते पिकलेलं, रसाने भरलेलं असतं. आवाज कमी आला तर, ते गोड चवदार नसते.
कलिंगड लहान असूनही जड वाटलं पाहिजे. जड म्हणजे अधिक रस, अधिक गोडवा.
पांढरे/हिरवे डाग, कच्चं कलिंगड,भेगा, छिद्रे दाणेदार पोत, चव कमी,पिवळा डाग नाही ही लक्षणे खाण्यायोग्य कलिंगड नसण्याची आहे.
गोलसर आकृती, गडद आणि अरुंद पट्टे, पिवळा डाग, खोल टॅप आवाज आणि जडपणा – हेच गोड कलिंगड निवडण्याची योग्य ट्रिक आहे.