Missile Technology Courses: भारतासाठी मिसाईल तयार करायचं स्वप्न आहे? मग 'हा' कोर्स नक्की करा आणि मिळवा ISRO-DRDO मध्ये मोठं पॅकेज असलेली नोकरी!
esakal May 10, 2025 10:45 PM

ISRO DRDO Recruitment 2025: ऑपरेशन सिंदूरपासून ते भारत-पाक तणावापर्यंत तुम्ही अनेकदा मिसाइल हल्ल्याचं नाव ऐकलं असेल. देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिसाइल्स आता केवळ चित्रपटांपुरत्याच किंवा युद्धाच्या बातम्यांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत.

जर तुमचंही स्वप्न असं असेल की तुम्ही भारतासाठी ब्रह्मोस, अग्नी किंवा इतर प्रगत मिसाईल डिझाइन करणाऱ्या टीमचा भाग व्हावं, तर आता हे स्वप्न साकार करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

मात्र, यासाठी योग्य शैक्षणिक दिशा आणि कोर्सेसची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचं असतं, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते गोंधळात पडतात. चला, पाहूया की मिसाईल टेक्नोलॉजीमध्ये यशस्वी करिअरसाठी कोणते कोर्स करावेत आणि शिक्षण कुठे घ्यावं.

मिसाईल बनवण्यासाठी कोणता कोर्स करावा?

जर तुम्हाला मिसाईल डिझाईन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर एअरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा मेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे सर्वोत्तम पर्याय आहेत. हे कोर्सेस तुम्हाला मिसाइलच्या रचना, विकास, आणि चाचणी प्रक्रियेबद्दल सखोल ज्ञान देतात.

याशिवाय, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, किंवा रॉकेट प्रपल्शन सारख्या विशेष शाखांमध्ये शिक्षण घेतल्यास तुम्हाला या क्षेत्रात अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. हे कोर्सेस केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाहीत, तर ISRO, DRDO यांसारख्या संस्थांमध्ये नोकरीसाठीही तुम्हाला पात्र बनवतात.

टॉप कॉलेज जिथे करता येईल शिक्षण

मिसाइल आणि डिफेन्स टेक्नोलॉजीसारख्या क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी खालील प्रमुख संस्थांमध्ये शिक्षण घेणं फायदेशीर ठरतं:

IIT मुंबई, IIT कानपूर, IIT मद्रास : भारतातील नामांकित अभियांत्रिकी संस्था

IIST (Indian Institute of Space Science and Technology) : ISROशी संलग्न संस्था, खास स्पेस आणि मिसाइल टेक्नोलॉजीसाठी

BITS पिलानी : खासगी पण दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण संस्था

IIIT हैदराबाद : रिसर्च आणि टेक इनोव्हेशनसाठी ओळखले जाणारे संस्थान

DRDOशी संलग्न विद्यापीठं आणि रिसर्च लॅब्स

या संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही ISRO, DRDO, HAL, BHEL, किंवा विविध खाजगी डिफेन्स कंपन्यांमध्ये नोकरी करू शकता.

पात्रता काय लागते?

मिसाइल किंवा एअरोस्पेस टेक्नोलॉजीशी संबंधित कोर्सेस करण्यासाठी १२वीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) आवश्यक त्यानंतर JEE Main/Advanced सारख्या प्रवेश परीक्षांद्वारे टॉप अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेता येतो

नोकरीच्या संधी कुठे मिळतात?

ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) : सॅटेलाइट, लाँच व्हेईकल, स्पेस रिसर्च

DRDO (रक्षा संशोधन व विकास संस्था) : मिसाइल, डिफेन्स सिस्टिम्स

HAL (हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड) : एअरक्राफ्ट आणि डिफेन्स इक्विपमेंट

BrahMos Aerospace : सुपरसोनिक मिसाइल सिस्टम

भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे रिसर्च विंग्स

या क्षेत्रांमध्ये तुम्हाला संशोधन, डिझाईन, उत्पादन आणि परीक्षण अशा विविध भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.