Maharashtra 10th Result : दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, कुठे आणि कसं चेक कराल?
Saam TV May 10, 2025 10:45 PM

Maharashtra SSC Result 2025 Expected Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (maharashtra state board of secondary and higher secondary education) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या (SSC Exam Result) निकालाची नेमकी तारीख लवकरच जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंबंधी वृत्त दिलं आहे.

करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं वर्ष आणि आयुष्याचा टर्निंग पॉइंट समजल्या जाणाऱ्या लवकरच जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची नेमकी तारीख आणि वेळ सांगण्यात येईल. साधारण १६ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक दहावी परीक्षेच्या निकालाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल बघता येणार आहेत. तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन निकालाची घोषणा करण्यात येईल. त्यात दहावी परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात येईल.

Maharashtra SSC Result 2025 कसा आणि कुठे बघता येईल?

ऑनलाइन पाहण्यासाठी जाणून घ्या प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत mahahsscboard.in संकेतस्थळाला भेट द्या.

संकेतस्थळाच्या होमपेजवरील दहावीच्या निकालासंबंधी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर नवं पेज दिसेल. त्यावरच्या रकान्यात संबंधित विद्यार्थ्यांनी आपले लॉग-इन डिटेल्स भरावेत.

सबमिट केल्यानंतर तुमचा रिझल्ट दिसेल.

रिझल्ट बघितल्यानंतर प्रत डाउनलोड कराल.

निकालाची प्रिंट काढा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.