नेपाळी गुरखा भारतीय लष्करात कसे? किती असतो त्यांचा पगार?
esakal May 10, 2025 10:45 PM
Nepali Gurkhas अनोखी लष्करी परंपरा

भारतीय सैन्यात गुरखा सैनिकांची नेपाळहूनही भरती केली जाते. ही एक अनोखी लष्करी परंपरा आहे.

Nepali Gurkhas नेपाळी अधिकारी वीरचक्र विजेते!

कारगिल युद्धातील 1/11 गुरखा रायफल्सचे कर्नल ललित राय हे नेपाळी वंशाचे अधिकारी वीर चक्र विजेते आहेत.

Nepali Gurkhas भारतात 60% नेपाळी गुरखे

गोरखा रेजिमेंटमधील अंदाजे 60 टक्के सैनिक नेपाळमधून तर उर्वरित भारतातील आहेत.

Nepali Gurkhas तीन देश एकत्र भरती करतात

नेपाळमध्ये ब्रिटन, भारत आणि नेपाळ एकत्र येऊन गोरखांची भरती करतात. यात

लेखी + शारीरिक चाचणीचा समावेश आहे.

Nepali Gurkhas ब्रिटिश आर्मी पहिली पसंती

उत्तम पगारामुळे गोरखा उमेदवार पहिल्यांदा ब्रिटिश आर्मी निवडतात, त्यानंतर भारतीय आर्मी.

Nepali Gurkhas वेतन आणि फायदे कोणते?

गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांचा पगार त्यांच्या पदावर अवलंबून असतो. सुरुवात 25,000 रुपयांपासून होते. निवृत्तीनंतर त्यांना भारतीय सैनिकांसारखेच वैद्यकीय व पेन्शनचे फायदे मिळतात.

Nepali Gurkhas पहिली नासिरी रेजिमेंट

ब्रिटिशांनी 1815 मध्ये पहिली नासिरी रेजिमेंट स्थापन केली होती, त्यानंतर गोरखा रेजिमेंट वाढत गेली.

Nepali Gurkhas 1947 मध्ये तीन देशांचा करार

स्वातंत्र्यानंतर भारत-नेपाळ-ब्रिटन त्रिपक्षीय कराराद्वारे गुरखा रेजिमेंटचे वाटप झाले.

Nepali Gurkhas आजही ‘गोरखा’ हा ब्रँड आहे

भारताच्या सीमांवर आजही 35,000 नेपाळी सैनिक चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असून त्यांचं शौर्य, निष्ठा आणि योगदान आजही अमूल्य आहे.

Virat Kohli १०० कसोटी, ३० शतके... विराटची कशी आहे कसोटी कारकिर्द?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.