Tanvi The Great Movie: भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत मान्यवर अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी या त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ५० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरमध्ये त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या असून, आज पल्लवी पुन्हा एकदा अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात झळकणार आहेत.
त्यांच्या भूमिकांमधील सखोल समज, संयत अभिनयशैलीसाठी ओळखल्या जाताच. ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटांमधून त्यांनी केवळ निर्माता म्हणून नव्हे, तर कलाकार म्हणूनही आपली छाप सोडली होती. ‘द काश्मीर फाईल्स’ मधील त्यांच्या सशक्त भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय मांडले.
‘’ हा त्यांचा आगामी सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर करत आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून पल्लवी जोशी यांचा "कॅरेक्टर पोस्टर" शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पल्लवी जोशी एका गंभीर, पण आत्मविश्वासू भूमिकेत दिसून येत आहेत. अनुपम खेर यांनी या पोस्टसोबत लिहिलं, “ती केवळ महान अभिनेत्रीच नाही, तर एक प्योर सोल देखील आहे – भेटा ‘तन्वी द ग्रेट’ला!”
या चित्रपटाबाबत अद्याप अधिक माहिती उघड झालेली नसली तरी, पल्लवी जोशींची उपस्थिती आणि अनुपम खेर यांचं दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे हे दोघे कलाकार पुन्हा एकदा एका प्रभावी कलाकृतीसाठी एकत्र येत आहेत, हे नक्कीच उत्साहवर्धक आहे.