Asduddin Owaisi: "पाकिस्तानी अधिकृत भिकारी, त्यांना 'इंटरनॅशनल मिलिंटट फंड' मिळालाय"; औवेसीं घणाघात
esakal May 11, 2025 01:45 AM

Asduddin Owaisi: भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या युद्धस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया आणि हल्ले करण्यासाठी विविध उपकरणांचा वापर केला जात आहे. यापार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचा निधी मंजूर केला आहे. यावरुन आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे भडकले आहेत. पाकिस्तान अधिकृत भिकारी देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी अधिकृत भिखारी - ओवैसी

ओवैसी म्हणाले, पाकिस्तानी लोक हे अधिकृतरित्या भीक मागणारे लोक आहेत. IMF कडून त्यांनी १ बिलियन डॉलरच कर्ज घेतलं आहे. ७५ वर्षात तुम्ही काय केलंय मग? तुमच्यावर ही परिस्थिती कोणी आणली? सर्वात वाईट गोष्ट ही आहे की, आयएमएफकडून कर्ज घेत आहेत. हा खरंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड नाही तर इंटरनॅशनल मिलिटंट फंड आहे. हा निधी पाकिस्तान कशासाठी वापरणार आहे?

अमेरिका, जर्मनी, जपान पाठिंबा कसा देतात?

आता तुम्ही पाहू शकता अमेरिका, जर्मनी, जपान हे लोक पाकिस्तानला असा निधी देण्यासाठी कसा पाठिंबा देतात. कारण सध्या आपल्या जमिनीवर, आपल्या घरांवर आणि आपल्या जवानांवर हल्ले करत आहेत आणि दुसरीकडं यांना १ अब्ज डॉलरच कर्ज दिलं जात आहे. सरकार चालवणं तर दूर तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था चालवता येत नाहीए.

तिथं बसून तुम्ही सांगता की इस्लाम असा इस्लाम तसा, पण काहीही नाही. तुमची चुकीची धोरणं याला कारणीभूत आहेत. भारतात शांतता भंग करण्यासाठी, इथं हिंदू-मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी तुम्ही कुरघोड्या करत आहात, अशा शब्दांत असदुद्दीनं ओवैसी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.