Bhool Chuk Maaf: आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या '' या चित्रपटाच्या थिएटर रिलीजच्या अचानक रद्दबातलामुळे पीव्हीआर सिनेमाजने प्रोडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सवर 60 कोटींचा दावा ठोकला आहे. हा चित्रपट 9 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मेकर्सनी 8 मे रोजी थिएटर रिलीज रद्द करत 16 मे रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर थेट ओटीटी रिलीजची घोषणा केली.
पीव्हीआरचे सीईओ कमल ज्ञानचंदानी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांनी सांगितले की, सर्व करार पूर्ण झाल्यानंतर आणि चित्रपटाच्या प्रमोशननंतर असा निर्णय घेणे हे 'ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट' (करारभंग) आहे. त्यामुळे त्यांनी बॉम्बे हायकोर्टात मॅडॉक फिल्म्सविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, देशभरात वाढलेल्या सुरक्षा उपाययोजनांमुळे आणि 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर थिएटर रिलीज योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांनी ओटीटी रिलीजचा मार्ग स्वीकारला. मात्र, पीव्हीआरने असा दावा केला आहे की, हा निर्णय खराब अॅडव्हान्स बुकिंगमुळे घेतला गेला असून, त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी मुंबईतील न्यायालयात झाली असून, अंतिम निर्णय सोमवार, 12 मे रोजी अपेक्षित आहे. दरम्यान, व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून सांगितले की, पीव्हीआर-आयनॉक्सने मॅडॉक फिल्म्सविरुद्ध 60 कोटींचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे चित्रपटाच्या ओटीटी रिलीजवर स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.