देहू, ता. ११ : संत तुकाराम महाराज संस्थान व देहू शहर शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थ व भाविकांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यामध्ये हृदयरोग तपासणी, बी.पी. व मधुमेह तपासणी, ईसीजी तपासणी, रक्तातील सर्व प्रकारची तपासणी, डोळे तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिरात ६५० नागरिकांनी वेगवेगळ्या तपासण्या करून औषध उपचार घेतले. जिल्हा रुग्णालय औंधचे डॉक्टर, नर्स, मदतनीस तसेच ईशा नेत्रालयाचे डॉक्टर यांनी सहकार्य केले.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, कीर्तनकार संतोष महाराज काळोखे, दिलीप महाराज खेंगरे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवासेना नेते विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, पिं.चिं. शहरप्रमुख नीलेश तरस, भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब काळोखे, माजी सरपंच कांतिलाल काळोखे, संत तुकाराम महाराज साखर कारखान्याचे संचालक छबुराव महाराज कडू, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, सूर्यकांत काळे उपस्थित होते. शिवसेना देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, महिला आघाडी तालुका संघटक शुभांगी काळंगे आदींनी सहकार्य केले.
---