पाकिस्तानचे भोलारी, जैकोबाबाद, सरगोधा, नूर खान एअरबेस भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त; सॅटेलाईट फोटो पहिल्यांदाच समोर
GH News May 12, 2025 12:11 AM

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर एअर स्ट्राईक करून नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी थांबली नाही. पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार सुरूच ठेवला. पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नाही तर पाकने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे निकामी ठरवली आणि हा हल्ला उधळून लावला. पाकिस्तानची जिरवण्यासाठी भारताने 10 मे रोजी सकाळी पाकिस्तानच्या एअरबेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे पाकिस्तानचे एअरबेसचं मोठं नुकसान झालं आहे. भारताने पाकचे एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं स्पष्ट केलं. पण पाकिस्तानने असं काही झालंच नसल्याचा कांगावा केला. पण आता पहिल्यांदाच सॅटेलाईट फोटोसमोर आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झालीच आहे, पण पाकिस्तानचं किती नुकसान झालंय हे जगासमोर आलं आहे.

भारताने 10 मे रोजी अचूक हवाई हल्ले करून पाकिस्तानच्या हवाई दलाच्या प्रमुख एअरबेसवर हल्ला चढवून मोठं नुकसान केलं आहे. भारताची खासगी सॅटेलाईट फर्म KAWASPACE आणि चिनी फर्म MizhaVision ने सॅटेलाईट फोटो जारी केले आहे. या दोन्ही सॅटेलाईट फर्मच्या उच्च रिझॉल्यूशन सॅटेलाईट इमेजरीने हल्ल्याचा प्रभाव किती मोठा होता याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात भारताने एअर लॉन्चड क्रूझ मिसाईलचा वापर केला. तसेच ब्रह्ममोसचाही वापर झाल्याची शक्यता आहे.

भोलारी एअरबेस: पूर्ण बेचिराख

PAF चे भोलारी एअरबेस भारताच्या सर्वात घातक हल्ल्याचा निशाणा बनलं. KAWASPACE ने जारी केलेल्या फोटोत स्पष्टपणे पाहू शकता.

एअरबेसचं एक प्रमुख हँगर पूर्णपणे नष्ट करण्यात आलं आहे.

चारही बाजूने संरचनात्मक ढिगारा पसरलेला होता

इथूनच त्वरीत प्रतिक्रिया देण्याचं मिशन राबवलं जातचं, हे रनवेवरून हँगरचं अंतर पाहता स्पष्ट होतं.

जैकोबाबाद एअरबेस: मुख्य एप्रनवर हल्ला

PAF बेस शाहबाज (जैकोबाबाद) वरही भारतीय मिसाईलने अचूक हल्ला केला

सॅटेलाइट इमेजमध्ये मुख्य एप्रनवरील एक हँगरचं मोठं नुकसान झालं आहे.

एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) बिल्डिंगचंही किरकोळ नुकसान झालं आहे.

सरगोधा एअरबेस: रनवेचं नुकसान

सरगोधा एअरबेसवरील हल्ल्याचे फोटो हल्ल्याच्या काही तासातच समोर आले

रनवे आणि आसपासच्या संरचनेला थोडसं नुकसान झालं आहे.

हल्ल्याचा उद्देश बेसच्या ऑपरेशनल क्षमतेला सीमित करायचं होतं असं सांगितलं जातं.

नूर खान एअरबेस: ग्राऊंड इंफ्रास्ट्रक्चर निशाणा

चीनी फर्म मिजाविज़नने जारी केलेल्या फोटोतून दिसतं की,

नूर खान एअरबेसवरील भारताचा निशाणा ग्राऊंड सपोर्ट वाहने आणि मूळ ढाच्यांवर होता

हल्ल्याचा हेतू बेसच्या लॉजिस्टिक आणि सपोर्ट सिस्टिमला निष्क्रिय करणं होतं

या हल्ल्यानंतर संरक्षण विश्लेषकांनी सांगितलं की, दहशतवादाविरोधातील कारवाई आता राजकीय स्तरावर नाही तर सैन्य शक्तीच्या रुपाने होणार असल्याचं भारताने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितल्याचं दिसून येतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.