विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्यामुळे विराटसाठी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेला कसोटी सामना अखेरचा ठरला.
त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये फेअरवेल न मिळालेल्या दिग्गजांमध्ये आता विराटचाही समावेश झाला आहे.
याआधी कसोटीतून फेअरवेल न मिळालेल्या काही मोजक्या दिग्गज खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
भारताचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर २०१८ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याला फेअरवेलची अपेक्षा होती, पण त्याला तो मिळाला नाही. त्याच्यासाठी २०१६ साली इंग्लंडविरुद्ध राजकोटला खेळलेला सामना अखेरचा ठरला.
भारताचा विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागलाही फेअरवेल मिळाला नाही. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना हैदराबादला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ साली खेळला.
भारताकडून कसोटीत १३ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या राहुल द्रविड यानेही फेअरवेलचा सामना खेळला नाही. त्याच्यासाठी २०१२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऍडलेडला झालेला शेवटचा कसोटी सामना ठरला.
२०१२ चा ऑस्ट्रेलिया दौरा द्रविडसह लक्ष्मणसाठीही अखेरचा ठरला होता. लक्ष्मणसाठीही ऍडलेड कसोटीच अखेरची ठरली. त्यानेही फेअरवेल सामना खेळला नाही.
२०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मेलबर्न कसोटीनंतर धोनीने फेरअवेलचा सामना न खेळता अचानक कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी तो संघाचा कर्णधारही होता. पण तो निवृत्त झाल्यानंतर ही जबाबदारी विराटकडे आली.
विराटच्या निवृत्तीच्या काही दिवस आधीच रोहितनेही कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्यासाठी डिसेंबर २०२४ च्या अखेरीस मेलबर्नला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला अखेरचा सामना ठरला.