सातारा जिल्ह्यात भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू
Webdunia Marathi May 12, 2025 07:45 PM

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले. सातारा-लोणंद रस्त्यावरील सालपे गावाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला, जेव्हा एका भरधाव ट्रक आणि एका टेम्पो ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक झाली. अपघातात जीव गमावलेले भाविक कोल्हापूरमधील इचलकरंजी येथून उज्जैन दर्शनासाठी निघाले होते.

ALSO READ:

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेला एक टेम्पो ट्रॅव्हलर सालपे घाटावरून खाली येत होता. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकची धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की टेम्पोचे मोठे नुकसान झाले.माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा देखील घटनास्थळी पोहोचल्या आणि सर्व जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात २४ वर्षीय टेम्पो ट्रॅव्हलर चालक आणि ४८ वर्षीय महिलायांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एका महिला भाविकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित सर्व जखमी भाविकांवर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ:

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.