याशिवाय डिजीलॉकर अॅप, उमंग अॅप आणि एसएमएस सेवेद्वारेही निकाल तपासता येतो. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, शाळेचा क्रमांक, प्रवेशपत्र ओळखपत्र आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल.
CBSE Class 10th-12th Results: येथे तपासा निकाल
विद्यार्थी या तीन वेबसाइट्सद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतील.
CBSE 10th 12th Result 2025 LIVE: डिजीलॉकरवर लिंक कशी सक्रिय करायची?
CBSE 10th 12th Result 2025 LIVE:सीबीएसई बोर्ड निकाल २०२५ जाहीर होण्यापूर्वी डिजीलॉकरवर अकाउंट लिंक सक्रिय करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करू शकता-
अकाउंट अॅक्टिव्हेट करण्यासाठी यूआरएल वर व्हिजिट करा.
यानंतर अकाउंट क्रिएशन बटणावर क्लिक करा.
शाळेकडून तुम्हाला मिळालेला कोणताही ६ अंकी सुरक्षा कोड एंटर करा.
तुमच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर एंटर करा, त्यानंतर त्यावर आलेला OTP एंटर करून तुमचे खाते सक्रिय करा.