माजी खासदार, भाजपने नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने म्हटले आहे की, हिंदू शेरनी हनुमान चालीसां पढने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या नंबरवरून राणा यांना धमक्या येत आहेत. राणा यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहेत. तसेच सेवा पंधरवाडा समारोप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लोकार्पण सह देवाभाऊ राष्ट्रीय कब्बड्डी स्पर्धेच्या समरोपाला देखील ते उपस्थित राहतील.
डीएमओच्या बैठकीआधीच पाकिस्तान घाबरलाआज शस्त्रसंधीबाबत निर्णय घेण्यासाठी भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील डीजीएमओची बैठक होत आहे. या बैठकीत शस्त्रसंधीबाबत निर्णय घेतले जाणार आहे. मात्र, याबैठकीच्या आधीच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने ट्विट करत म्हटले की, पाकिस्तान शस्त्रसंधीचे पालन करेल. भारताच्या कोणत्याही भागावर हल्ला करणार नाही.
india Pakistan DGMO : आज 12 वाजता भारत आणि पाकिस्तानच्या DGMO मध्ये चर्चाभारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर दोनही देशांचे डीजीएमओमध्ये आज (सोमवारी) चर्चा होत आहे. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करतील, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक होत असून या बैठकीनंतर शस्त्रसंधी कायम राहणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे.