आजकाल प्रेक्षकांना हिरोईनसोबत मालिकेतील खलनायिका देखील तितकीच आवडत आहे. खलनायिकेमुळे मालिकेची शोभा वाढते. आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मालिकेत खलनायिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे. अशाच एका अभिनेत्रीने आता चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील खलनायिका म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अत्रे (Shruti Atre Pregnancy ) लवकरच होणार आहे. तिने नुकतीच आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. तिने 'मदर्स डे'च्या निमित्ताने ही खास बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो नवऱ्यासोबत शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. या फोटोला तिने खूपच भावनिक कॅप्शन दिलं आहे.
श्रुती अत्रे पोस्ट"हा वेगळा आहे.
आमचे कुटुंब आता मोठ होणार आहे. ही सर्वात सुंदर बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
प्रवास सोपा नव्हता... गुंतागुंत होती, अश्रू होते आणि भीतीचे क्षण होते. पण या सर्वांमध्ये खूप प्रेम होते...या काळात माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले.
प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"
श्रुती अत्रेला 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने राजश्री ढाले पाटील अशी खलनायिकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. यानंतर श्रुती अत्रेला हिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.