War 2 : 'वॉर 2' रिलीज होण्यापूर्वीच मालामाल? हृतिक रोशन-ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटाची मोठी अपडेट समोर
Saam TV May 13, 2025 12:45 PM

सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी आणि हिंदी चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही चित्रपटांचा मनसोक्त आनंद घेत आहेत. अशात चाहते आता 'वॉर 2' (War 2 ) उत्सुकतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात दोन सुपरस्टार आमने सामाने पाहायला मिळणार आहेत. 'वॉर 2'मध्ये बॉलिवूडचा स्टार अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर ( Junior ntr) एकत्र झळकणार आहेत.

'वॉर 2' हा एक चित्रपट आहे. नुकतीच या चित्रपटासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. 'वॉर 2' रिलीज आधीच कोट्यवधींचा व्यवसाय करणार असल्याचे बोले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'वॉर 2' रिलीज होण्याआधी जवळपास 85-120 कोटींची कमाई करणार आहे. 'वॉर 2'च्या निर्मात्यांना भाषेतील चित्रपटासाठी मोठी ऑफर देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, '2' तेलुगू भाषेतील चित्रपटाचे राइट्स 85-120 कोटी रुपयांना विकले जाऊ शकतात. साऊथचे मोठे निर्माते नागा वामसी आणि सुनील नारंग या स्पर्धेत असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.

'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर' चा सिक्वेल आहे. आता चाहते 'वॉर 2' मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच 'वॉर 2' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील पाहायला मिळणार आहे. चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.