टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या काही दिवसांआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहितने त्याआधीच टी 20i फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्यामुळे आता रोहित फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर अनेक स्तरातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच आजी माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. निवृत्तीच्या काही दिवसानंतर आता रोहितने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबतचे काही फोटो पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली. फडणवीस यांनी रोहितला कसोटी निवृत्ती नंतरच्या उर्वरित प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. रोहित शर्मा याची 10 महिन्यानंतर वर्षावर जाण्याची पहिली वेळ ठरली.