*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ मे २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २४ शके १९४७
☀ सूर्योदय -०६:०४
☀ सूर्यास्त -१८:५६
चंद्रोदय - २०:३७
⭐ प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०४
⭐ सायं संध्या - १८:५६ ते २०:०७
⭐ अपराण्हकाळ - १३:३७ ते १६:१३
⭐ प्रदोषकाळ - १८:५६ ते २०:०६
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०४
⭐ राहु काळ - १२:३१ ते १४:०८
⭐ यमघंट काळ - ०७:३९ ते ०९:१६
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी डोरली भक्षण करू नये.
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १७:२० ते १८:५६
अमृत मुहूर्त-- ०७:३९ ते ०९:१६
विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास नाही
चंद्र मुखात आहुती १०:५६ प.आहे.
शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४७
संवत्सर - विश्वावसु
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - वैशाख
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वितीया (२५:१७ प.नं. तृतीया)
वार - बुधवार
नक्षत्र - अनुराधा (१०:५६ प. नं. ज्येष्ठा)
योग - शिव (२९:५० प.नं. सिद्ध)
करण - तैतिल (१२:३९ प. नं. गरज)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - मेष
गुरु रास - वृषभ
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- रवि वृषभेत रा.११.३४, मु. १५, जघन्यसंज्ञक, संक्रांती पुण्यकाल दु.१२.३० ते सूर्यास्त, पुण्यकाळात गोदान, तिळदान, प्रातः स्नान, पितृतर्पण करणे, सौर ग्रीष्म ऋतु प्रारंभ, श्रीनारद जयंती, सर्वार्थसिद्धियोग-अमृतसिद्धियोग १०.५६ प.
या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.
नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्याने उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- वृषभ, मिथुन , कन्या , वृश्चिक , मकर , कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.