भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियात मोठया घडोमाडी घडताना दिसत आहेत. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या सलामी जोडीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित आणि विराट या दोघांची जागा कोण घेणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चांगलाच संतापला आहे. शमीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
मोहम्मद शमीच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारीत करण्यात आली आहे. त्यामुळे शमी संतापला. शमीने त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला. मोहम्मद शमी नक्की का संतापला? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
बीसीसीआय निवड समितीकडून लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी एक न्यूज पोर्टलवर रोहित शर्मा आणि विराट कोहला याच्यानंतर मोहम्मद शमी निवृत्त होणार असल्याचा दावा करण्यात आला. शमीला दुखापतीमळे इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमीला निवड समिती फिटनेसमुळे डच्चू देऊ शकते. मात्र शमीने या वृत्ताचं खंडन केलं आणि संताप जाहीर केला.
मोहम्मद शमी याने इंस्टाग्राम स्टोरीतून आपल्या मनातील भावना व्यक्त केली.”खूप चांगलं सुरुय महाराज. आता स्वत:च्या नोकरीचेही दिवस मोजा . त्यानंतर आमचं बघा. तुमच्यासारख्यांनी भविष्याचा सत्यानाश केलाय. काही तरी चांगलं बोला. आजची सर्वात वाईट बातमी, माफ करा”, अशा शब्दात मोहम्मद शमी याने सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे.
शमीची इंस्टा स्टोरी
दरम्यान मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. शमीला 2023 वनडे वर्ल्ड कप दरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे शमी 1 वर्ष टीम इंडियापासून दूर राहिला. त्यानंतर शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. शमीने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शमीची इंग्लंड दौऱ्यावर निर्णायक भूमिका असणार आहे. शमीच्या अनुभवाचा इतर गोलंदाजांना पर्यायाने टीम इंडियाला चांगला फायदा होऊ शकतो.