अनाया बांगर हीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अनायाने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. अनाया बांगर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी आहे. अनाया आधी मुलगा होता. मुलगा असलेल्या आर्यनने लिंगबदल केला आणि ती अनाया झाली. लिंगबदल करण्याआधी आर्यन बांगर यशस्वी जयस्वाल आणि सर्फराज खान या टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसोबत खेळला होता. आर्यनने इंग्लंडमध्ये जाऊन लिंगबदल केलं. त्यानंतर आर्यनला नवी ओळख मिळाली आणि तो चा ती झाली.
अनाया बांगर सध्या मुंबईत राहतेय. अनायाची मुंबईत स्कर्ट घालणार्या तरुणासोबत भेट झाल्याचा दावा केला जात आहे. अनायाने त्या तरुणासोबतचा फोटो इंस्टा स्टोरीत पोस्ट केला आहे.’द गाय इन स्कर्ट’ अनायाने असा हॅशटॅग या स्टोरीला दिला आहे.
अनाया बांगरने ‘फिल्मीज्ञान’ला मुलाखत दिली होती. अनायाने या मुलाखतीत भूकेबाबत किंवा तिच्या इच्छेबाबत सांगितलं जी लिंगबदल केल्यानंतरही कायम आहे. अनायाची ही भूक क्रिकेटबाबत आहे. “मला माहित नाही की काय होईल. पण मी कमबॅकसाठी पूर्ण प्रयत्न करत आहे”, असं उत्तर अनायाने क्रिकेटमधील कमबॅकबाबतच्या प्रश्नवर दिलं. अनाया आर्यन असताना डाव्या हाताने बॉलिंग आणि बॅटिंग करायचा.
अनाया बांगर मुलाखतीत भारतीय क्रिकेटबाबत भरभरुन बोलली. अनायाने या मुलाखतीत टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याचा उल्लेख केला. “विराटला अनेकदा भेटली आहे. विराटसोबत सराव केला आहे. विराट फार विनोदी आहे. तसेच तो खेळावर फार लक्ष केंद्रीत करतो”, असं अनायाने सांगितंल.
अनाया होण्याआधी आर्यनने क्लब क्रिकेट लेव्हलवर 15 सामने खेळले. आर्यनने या 15 सामन्यांमध्ये 24 चौकार आणि 4 षटकारांसह 260 धावा केल्या. तसेच आर्यनने 5 विकेट्सही घेतल्या.
तसेच आर्यनने कल्ब लेव्हलवरील टी 20 क्रिकेट प्रकारातील 5 सामन्यांमध्ये 32 धावा केल्या आहेत. तसेच आर्यनने टी 20 मध्ये एका डावात बॉलिंगही केली.मात्र त्याला विकेट घेण्यात यश नव्हतं आलं.