सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचं, रामदास आठवले मुख्यमंत्र्यांना लिहणार पत्र
Marathi May 15, 2025 08:25 PM

रामदास अथले: लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे मिळाले पाहिजेत. 2100 रुपये देऊ असे सरकारने सांगितले आहे. पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचे आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार आहे असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास  आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले. मला वाटते सामाजिक न्याय खाते बंद करायला नको, खाते बंद केल्यास माझं मंत्रिपद जाईल असेही आठवले म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील सरकार हे दहशतवाद्यांना ट्रेनिंग देऊन पूर्णपणे पाठबळ देत होते. आपल्या देशातील महिलांचं ज्यांनी कुंक पुसले त्यांना संपवण्यासाठी मोदींनी निर्णय घेतल्याचे रामदास आठवले म्हणाले. आपण जबरदस्त हल्ला केला आहे. दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. सिंधू पाणी बंद केले, त्यामुळं पाकिस्तान रडकुंडीला आला होता. त्यामुळं पाकिस्तानाने आम्हाला युद्ध करायचं नाही अशी भूमिका घेतल्याचे आठवले म्हणाले. आम्ही हार मानत असल्याचे पाकिस्तान म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवावा अशी मागणी देशवासियांनी केली आहे. देश मोदींच्या सोबत आहे. विरोधक सोबत असल्याचे सांगून पुरावे मागत आहे. पाकव्याप्त काश्मीर मिळावा, अशी भूमिका मी लोकसभेत मांडली आहे. आता अंतिम फैसला झाला पाहिजे असे आठवले म्हणाले.

महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आम्हाला जागा सोडल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. निवडणूक महायुती म्हणून लढवली पाहिजे अशी भूमिका माझ्या पक्षाची आहे. वेगळं लढल्यास आपलं नुकसान आहे असेही आठवले म्हणाले.

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला आहे. लाडकी बहीण पैसे मिळाले पाहिजे. 2100 रुपये देऊ सांगितले आहे. पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचे आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार आहे असे आठवले म्हणाले. कोणताही दबाव नाही. युद्ध थांबले असले तरीही पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भूमिका मांडली आहे. आम्हाला युद्ध नको असे आठवले म्हणाले. कुणाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आला आहे. आणखी हल्ला करायचा आहे, म्हणून पिछे हाट घेतली आहे असे आठवले म्हणाले.

सामाजिक न्याय खाते बंद करायला नको

मला वाटते सामाजिक न्याय खाते बंद करायला नको, खाते बंद केल्यास माझं मंत्रिपद जाईल. निधी वळवू नयेत अशी आक्रमक भूमिका आठवले यांनी मांडली आहे. आंतरजातीय विवाह योजना बंद बाबत माहिती नाही. अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला असेल असे आठवले म्हणाले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही

अजित पवार म्हणाले आहेत की आम्ही एकत्र येणार नाही. शरद पवार आमच्यासोबत आल्यास आंनद आहे. आमची ताकद आणखी वाढेल. मोदी म्हणाले होते शरद पवार माझे नेते आहेत. अजित पवार आम्हाला सोडणार नाहीत असे आठवले म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे आम्हाला वाटत नाही. असे झाल्यास महायुतीमध्ये फूट होईल. काँग्रेस राज ठाकरे यांना मानत नाही. राज आणि उद्धव एकत्र आल्यास फायदा होईल असेही आठवले म्हणाले. मी एकत्र यायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घ्यावी. मंत्रिपदसाठी मी येथे नाही. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका असेल तर एकत्र येण्याची माझी तयारी आहे असेही आठवले म्हणाले.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.