swt166.jpg
64195
मुणगेः विजेत्या स्पर्धकांसमवेत येथील नवतरुण उत्साही प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडीचे कार्यकर्ते व इतर मान्यवर.
मुणगेतील रेकॉर्ड डान्समध्ये
गुरूनाथ तुळसकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १६ः येथील जिल्ह्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरूनाथ तुळसकर प्रथम, समर्थ गवंडी द्वीतीय तर नंदिनी बिले यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४० स्पर्धक सहभागी झाले होते.
येथील नवतरुण उत्साही प्रासादिक भजन मंडळ मुणगे देऊळवाडी यांच्यावतीने त्रैयवार्षिक श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली होती. या निमित्ताने जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या होत्या. यामध्ये अनुक्रमे तुळसकर, समर्थ, नंदिनी, उत्तेजनार्थ सायली राऊळ, दिशम परब यांना रोख रक्कम, चषक प्रदान करण्यात आला. त्यांना रोख रक्कम, चषक आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
परिक्षक म्हणून नेहा जाधव (कुडाळ) यांनी काम पाहिले.
सुत्रसंचालन नेहा काणकेकर ऊर्फ सरीता वळंजू यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रमोद वळंजू, दादा वळंजू, रणजित आईर, आशिष आईर, दिपक तुरी, संजय आईर, अक्षय घाडी, केदार वळंजू यांनी मेहनत घेतली. यशस्वी स्पर्धकांना नवतरुण उत्साही प्रसादिक भजन मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सीताराम मुणगेकर, पंडित आईर, संभु आईर, रामतीर्थ कारेकर, विजय आईर, राहुल वळंजू, आनंद आईर, प्रसाद आईर, प्रभाकर देवळी, निखिल तुरी, संतोष आईर, गणेश आईर, रुपेश आईर, गजानन गावडे, ओंकार पाध्ये, उदय आईर, प्रसाद आईर, सुरेश आईर, राजेश आईर, विनोद आईर, दत्ताराम आईर आदी उपस्थित होते.