नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सुभासप आमदार अब्बास अन्सारी यांना मतदारसंघ मऊ येथे असताना उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील निवासस्थानी राहण्याची अनुमती दिली आहे. न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अंतरिम जामिनासाठीच्या आदेशात दुरुस्ती केली आहे. अन्सारी यांना गाजीपूरमध्ये 3 दिवसांपेक्षा अधिक राहता येणार नाही. तसेच गाजीपूर येथे असताना कुठलीही सार्वजनिक बैठक घेता येणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.